लाडक्या मुलीसाठी जुन्या साडीचं परकर पोलकं शिवायचंय? बघा ६ सुंदर डिझाईन, लेक दिसेल देखणी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2024 4:15 PM 1 / 8लग्नसराईच्या दिवसांत लहान मुलींच्या अंगावर परकर पोलक्यासारखे पारंपरिक कपडे खूप छान शोभून दिसतात.2 / 8तुम्हालाही तुमच्या लाडक्या लेकीसाठी परकर पोलकं शिवायचं असेल तर हे काही खास डिझाईन्स पाहा.3 / 8दोन वर्षांपर्यंतच्या मुलींना असं खांद्यावर लेस असणारे परकर पोलके छान दिसते. शिवाय ते काढायला- घालायलाही सोपे जाते.4 / 8 उन्हाळ्यातल्या उकाडाच्या त्रास चिमुकल्या मुलींना होऊ नये म्हणून अशा पद्धतीने गळा घेऊन पोलकं शिवू शकता. ५- ६ वर्षांपर्यंतच्या मुलींनाही ते छान दिसेल.5 / 8आता अशा पद्धतीच्या झालर असणाऱ्या परकरची फॅशन आली आहे. 6 / 8अगदी पारंपरिक जुन्या पद्धतीने परकर पोलकं शिवायचं असेल तर अशा पद्धतीने शिवू शकता. यावर ठुशी, नथ असे पारंपरिक दागिने घातले की मुली खूप सुंदर दिसतात. 7 / 8अशा पद्धतीने जॅकेटचा ड्रेसही शिवू शकता. साडीच्या पदराचे असे जॅकेट मुलींना खूप छान लूक देते. शिवाय हे जॅकेट त्यांना इतर ड्रेसवरही घालता येते.8 / 8जुन्या साडीचे सुंदर परकर पोलके शिवण्यासाठी हे आणखी एक छान डिझाईन पाहा. आणखी वाचा Subscribe to Notifications