गौरी- गणपतीच्या सणासाठी करा मोत्यांचा साज! बघा मोत्याच्या दागिन्यांचे देखणे सुंदर प्रकार By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2024 9:19 AM 1 / 7सोन्याच्या दागिन्यांना वेगळीच झळाळी असली तरी मोत्याच्या दागिन्यांचे सौंदर्य काही वेगळेच असते. गौरी गणपतीच्या सणादरम्यान एखाद्या दिवशी मोत्याचे दागिने घालून छान तयार व्हा.. तुमच्या घरच्या गौरी किंवा महालक्ष्मीसाठीही तुम्ही मोत्याचे दागिने खरेदी करू शकता.2 / 7मोत्याची चिंचपेटी हा एक अतिशय लोकप्रिय दागिना.. गळ्याभोवती फिट बसणारा हा दागिना सौंदर्य खुलविणारा ठरतो.3 / 7गळ्याशी चिंचपेटी आणि त्याखाली हा लांब तन्मणी घातला की मग इतर कोणत्याही दागिन्याची गरज पडत नाही. किंवा नुसता तन्मणी गळ्यात घातला तरी तो खूप आकर्षक वाढतो.4 / 7हल्ली बऱ्याच ठिकाणी आता अशी मोत्याची ठुशी देखील मिळते. मोत्याच्या ठुशीचा हा प्रकार लहान मुलींनाही खूप छान दिसतो.5 / 7मोत्याच्या अशा टपोऱ्या बांगड्या हातात असल्या की मग इतर कोणत्या बांगड्यांची गरजच नाही..6 / 7कानातल्यांचे इतर अनेक प्रकार एकीकडे आणि लक्षवेधी टपोऱ्या कुड्या एकीकडे. हल्ली पारंपरिक कुड्यांमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आले आहेत.7 / 7अशा पद्धतीच्या मोत्यांच्या बुगड्या घालण्याची फॅशनही सध्या खूप ट्रेण्डिंग आहे. त्यामध्येही अनेक नवनविन प्रकार पाहायला मिळतात. आणखी वाचा Subscribe to Notifications