नवराई लाडाची आणि तिच्यासाठी खास मोत्यांचा साज! साडीच्या रंगानुसार 'असे ' निवडा परफेक्ट दागिने..

Updated:April 6, 2025 17:56 IST2025-04-06T17:51:39+5:302025-04-06T17:56:10+5:30

Moti design jewellery for bride: Bridal pearl jewellery set: How to choose saree color for jewellery: Saree and jewellery matching tips: Wedding fashion tips for brides: आपल्या साडीच्या रंगानुसार आपण मोत्याचे दागिने खरेदी करायला हवे.

नवराई लाडाची आणि तिच्यासाठी खास मोत्यांचा साज! साडीच्या रंगानुसार 'असे ' निवडा परफेक्ट दागिने..

अनेकदा लग्नसराईत खरेदी करताना आपला गोंधळ उडतो. त्यात नवरीची खरेदी असेल तर विचारु नका. साडीनुसार ज्वेलरी निवडताना तारेवरची कसरत असते. त्यात नवरीला मोत्यांचे दागिने हवे असतात. (Moti design jewellery for bride)

नवराई लाडाची आणि तिच्यासाठी खास मोत्यांचा साज! साडीच्या रंगानुसार 'असे ' निवडा परफेक्ट दागिने..

मोत्याचे दागिने खरेदी करताना नेमकं काय करायला हवे किंवा कशा प्रकारे खरेदी करायला हवी याची माहिती आपल्या नसते. मोत्यांमध्ये देखील अनेक रंगांचे प्रकार असतात. यामध्ये रिअल कल्चर्ड मोती, बसरा मोती, साऊथ सी, फ्रेश वॉटर फॉल, ताहिती सी, व्हेनेझुला, माबे मोती असतात. (Bridal pearl jewellery set)

नवराई लाडाची आणि तिच्यासाठी खास मोत्यांचा साज! साडीच्या रंगानुसार 'असे ' निवडा परफेक्ट दागिने..

आपल्या साडीच्या रंगानुसार आपण मोत्याचे दागिने खरेदी करायला हवे. जर आपण देखील अशाप्रकारची ज्वेलरी खरेदी करत असू तर या टिप्स लक्षात ठेवा. (Wedding fashion tips for brides)

नवराई लाडाची आणि तिच्यासाठी खास मोत्यांचा साज! साडीच्या रंगानुसार 'असे ' निवडा परफेक्ट दागिने..

बनारसी साडी किंवा कांजीवरम साडी लग्नात नेसणार असाल तर मोत्याचा मोठा हार आपल्या गळ्याची शोभा वाढवेल. लांब मोत्याचे हार साडीवर शोभून दिसतील.

नवराई लाडाची आणि तिच्यासाठी खास मोत्यांचा साज! साडीच्या रंगानुसार 'असे ' निवडा परफेक्ट दागिने..

पांढऱ्या रंगाची मोत्याची माळ ही कोणत्याही रंगाच्या साडीवर सुट होते. ही माळ आपण लग्नातच नाही तर ऑफिस वेअरमध्ये देखील अॅड करु शकतो.

नवराई लाडाची आणि तिच्यासाठी खास मोत्यांचा साज! साडीच्या रंगानुसार 'असे ' निवडा परफेक्ट दागिने..

लग्नात मोत्याची नथ घालायची असेल तर पिवळ्या मोत्यांची नथ घाला. ही नथ कोणत्याही साडीवर उठून दिसते. तसेच यामध्ये गुलाबी रंगाचा खडा निवडा.

नवराई लाडाची आणि तिच्यासाठी खास मोत्यांचा साज! साडीच्या रंगानुसार 'असे ' निवडा परफेक्ट दागिने..

मोत्याचे दागिने घालत्यानंतर बोटांमध्ये अंगठी तर हवीच. अंगठी निवडताना मोती लहान निवडावेत. ज्यामुळे साडीवर ती शोभून दिसेल.

नवराई लाडाची आणि तिच्यासाठी खास मोत्यांचा साज! साडीच्या रंगानुसार 'असे ' निवडा परफेक्ट दागिने..

मोत्याचे कानातले, कुडी हे नऊवारी साडीवर शोभून दिसतात. बाजारामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये पाहायला मिळतात. लाल खडा असलेल्या मोरांचे मोत्याचे कानातले अधिक आकर्षित दिसतील.

नवराई लाडाची आणि तिच्यासाठी खास मोत्यांचा साज! साडीच्या रंगानुसार 'असे ' निवडा परफेक्ट दागिने..

तन्मणीमध्ये पिवळी, गुलाबी, पांढरा अशा वेगळ्या रंगाचे मोती आपल्याला पाहायला मिळतील. साडीवर ते अधिक शोभून दिसतील.

नवराई लाडाची आणि तिच्यासाठी खास मोत्यांचा साज! साडीच्या रंगानुसार 'असे ' निवडा परफेक्ट दागिने..

हिरव्या बांगड्यांमध्ये मोत्याच्या बांगड्या आणि तोडे आपल्या सौंदर्यात भर घालतात. हे आपण कोणत्याही साडीवर घालू शकतो.