1 / 11मंगळसूत्र हा असा एक अलंकार आहे जो बहुतांश स्त्रिया अगदी रोजच्या रोज वापरतात. मंगळसूत्राच्या पेंडंटमध्ये खूप डिझाईन्स मिळतात. पुर्वी फक्त त्यात वाट्या असायच्या पण आता मात्र वेगवेगळ्या डिझाईनचे पेंडंट मिळतात.2 / 11अगदी खड्यांचे किंवा आता तर मोत्यांचे सुद्धा असे देखणे पेंडंट मिळतात. त्यामुळे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तर अशा मोत्याचे पेंडंट असणाऱ्या शॉर्ट मंगळसूत्राची खरेदी करा. 3 / 11त्यासाठीच बघा हे एकापेक्षा एक देखणे पर्याय. अशा कितीतरी प्रकारात तुम्हाला मोत्यांचं पेंडंट मिळू शकतं.4 / 11थोडंसं हेवी लूक असणारं मंगळसूत्र आवडत असेल तर अशा मंगळसूत्राचा तुम्ही विचार करू शकता.5 / 11मोत्याच्या मंगळसूत्राचं हे बघा अगदी नाजुक, सुंदर डिझाईन. हे डिझाईन एवढं छान आहे की ते तुम्ही साडीसोबतच वेस्टर्न कपड्यांवरही घालू शकता.6 / 11 हे दोन लेयर असणारं मोत्याचं मंगळसूत्र तुमच्या गळ्याची शोभा वाढविणारं ठरेल हे नक्की.7 / 11मोत्याच्या मंगळसूत्राचा हा आणखी एक हटके पॅटर्न.. असं युनिक डिझाईन क्वचितच कुणाकडे असतं..8 / 11ज्यांना खूप नाजूक मंगळसूत्र आवडतात त्यांना हे डिझाईन नक्कीच आवडू शकतं. 9 / 11हे पाहा मोत्याचं अतिशय आकर्षक नाजुक फुल.. हे डिझाईन एवढं खास आहे की बघताक्षणीच कोणालाही आवडू शकतं..10 / 11अशा पद्धतीचे मोत्याचे पेंडंट असणारे मंगळसूत्र नेहमीच ट्रेंडींग असतात. असं एखादं आपल्या कलेक्शमध्ये असायलाच हवं.11 / 11मोत्याच्या मंगळसूत्राचं हे आणखी एक सुपरक्लासी लूक देणारं देखणं मंगळसूत्र..