Join us   

दिवाळी स्पेशल : यंदा दिवाळीच्या स्पेशल साड्यांवर शिवा पफ बाह्यांचे ‘असे’ ब्लाऊज, ७ डिझाइन्स नव्या फॅशनचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2024 5:35 PM

1 / 10
साडी विकत घेतल्यानंतर ब्लाउज कोणत्या डिझाईनचा शिवायचा असा प्रश्न अनेकांना पडतो (Blouse Design). ब्लाउजच्या डिझाईनमध्ये देखील अनेक प्रकार आले आहेत (Diwali). पण बहुतांश जणांना अजूनही फुगाच्या बाह्यांचे (Blouse Design) ब्लाउज डिझाईन आवडतात(Puff Sleeve Blouse Designs For Sarees).
2 / 10
फुगाच्या बाह्यांचे ब्लाउज हे फार पूर्वीपासून मुलींसाठी फॅशन स्टेण्टमेण्ट बनलं आहे. पण जसा काळ बदलत गेला, तस तसं यात बदल पाहायला मिळत गेले.
3 / 10
दिवाळीसाठी नक्कीच आपण शॉपिंग केली असेल. जर आपण साडी घेतली असेल आणि त्याच डिझाईनचे ब्लाउज घालून कंटाळा आला असेल आणि नवीन काहीतरी ट्राय करायचं असेल तर, हे ७ पफ स्लिव्हजचे ब्लाऊज पॅटर्न्स पाहा. आपल्याला नक्कीच आवडतील.
4 / 10
जर आपल्याला फुल बाह्यांचे ब्लाउज घालायला आवडत असतील तर, त्याला एक ट्विस्ट द्या. फुल बाह्यांवर पफ शिवा. पफ स्लिव्हजच्या ब्लाऊजमध्ये प्लेन हात दिसणार नाहीत.
5 / 10
पुढचा गळा बोटनेक किंवा बंद गळ्याचे पॅटर्न आपण ट्राय करू शकता. जर साडी प्लेन असेल तर, आपण पदर वन- साईड घेऊ शकता.
6 / 10
जर आपल्याला हाफ बाह्यांचे ब्लाउज शिवायचं असेल तर, हाफ स्लीव्ह पफ ट्राय करून पाहा. जर ब्लाउज पीसला काठ असेल तर, पफ खाली काठ लावा. ब्लाउज सुरेख दिसेल.
7 / 10
राउंड नेक पफ स्लीव्ह ब्लाउज देखील ट्रेण्डींग आहे. प्लेन साड्यांवर अशा प्रकारचे ब्लाउज शोभून दिसतील.
8 / 10
शॉर्ट किंवा थ्री-फोर स्लिव्हजमध्ये आपण पफ अॅड करू शकता. त्याच्याखाली मोती किंवा लेस लावून ब्लाउजला आणखीन सुरेख टच देऊ शकता.
9 / 10
जर आपल्याला जास्त फुगीर बाह्या आवडत नसतील तर, हलके पफ काढा. आणि स्लिव्ह लांब ठेवा. यामुळे नक्कीच ब्लाउजला रिच लूक मिळेल.
10 / 10
यू-नेक हाफ स्लीव्ह पफ ब्लाउज देखील सिम्प्ल साड्यांवर शोभून दिसेल.
टॅग्स : दिवाळी 2024फॅशनसोशल व्हायरल