राधिका मर्चंटचे सुंदर 'बटरफ्लाय' ब्रेसलेट, पाहा बटरफ्लाय मंगळसूत्राचा नवा ट्रेण्ड- ७ सुंदर डिझाईन्स
Updated:February 18, 2025 15:30 IST2025-02-18T13:57:27+5:302025-02-18T15:30:39+5:30

राधिका मर्चंटच्या मंगळसूत्राची सध्या सोशल मिडियावर खूप चर्चा सुरू आहे. काही दिवसांपुर्वी ती एका कार्यक्रमासाठी गेली असता तिने पांढऱ्या ड्रेसवर फुलपाखराच्या आकाराचं सुंदर मंगळसूत्र घातलं होतं.(Radhika Merchant Ambani's stunning butterfly mangalsutra)
काही दिवसांपुर्वी सोनेरी रंगाच्या गाऊनवर आणि नंतर एकदा काळ्या रंगाच्या गाऊनवर तिने हेच मंगळसूत्र ब्रेसलेटप्रमाणे हातात घातलं होतं. फुलपाखराच्या आकाराचं पेंडंट असणाऱ्या मंगळसूत्राचा आणि ब्रेसलेटचा सध्या खूपच ट्रेण्ड आला असून त्याचेच हे काही आकर्षक डिझाईन्स पाहा..(7 beautiful designs of mangalsutra bracelets)
असं दोनपदरी मंगळसूत्र ब्रेसलेटही सध्या अनेक जणींना आवडत आहे.
ज्यांना खूपच नाजूक दागिने आवडतात त्यांना असं एकेरी मंगळसूत्र ब्रेसलेट आवडू शकतं.
बटरफ्लाय मंगळसूत्रामध्ये असणारं हे आणखी एक अतिशय नाजूक ब्रेसलेट डिझाईन..
जर तुम्हाला थोडं ठशठशीत पेंडंट घ्यायचं असेल तर अशा पद्धतीच्या पेंडंटचाही तुम्ही विचार करू शकता..
रंगबेरंगी फुलपाखरू नेहमीच सगळ्यांना आवडून जातं. या मंगळसूत्रातील त्या फुलपाखराचे रंगही अतिशय आकर्षक आहेत.
हार्टशेप आणि त्यामध्ये असणारं फुलपाखरू हे डिझाईन नक्कीच खूप वेगळं, युनिक आहे.
खूप मोठंही नाही आणि अगदीच नाजुकही नाही. अशा पद्धतीचं पेंडंट घ्यायचं असेल तर हे डिझाईन तुम्हाला आवडू शकतं.