सलग १ महिना रोज १६ तास पेंटींग करून तयार झाला राधिका मर्चंटचा सुंदर लेहेंगा... बघा त्याचं सौंदर्य

Published:July 15, 2024 12:11 PM2024-07-15T12:11:59+5:302024-07-15T12:17:59+5:30

सलग १ महिना रोज १६ तास पेंटींग करून तयार झाला राधिका मर्चंटचा सुंदर लेहेंगा... बघा त्याचं सौंदर्य

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं भारतातलं बहुचर्चित लग्न नुकतंच मोठ्या थाटामाटात पार पडलं. लग्नात नवरी राधिका मर्चंट हिचे सगळेच लेहेंगे आणि लूक्स बघण्यासारखे होते.

सलग १ महिना रोज १६ तास पेंटींग करून तयार झाला राधिका मर्चंटचा सुंदर लेहेंगा... बघा त्याचं सौंदर्य

लग्नप्रसंगातल्या एका सोहळ्यात राधिकाने गुलाबी रंगाचा सुंदर लेहेंगा घातला होता. या लेहेंग्याचं वैशिष्ट्य असं की तो लेहेंगा कारागीरांनी हाताने सुबक पेटींग करून तयार केला हाेता. त्यामुळे तिच्या इतर सगळ्या लेहेंग्यांपेक्षा तो अतिशय वेगळा ठरला.

सलग १ महिना रोज १६ तास पेंटींग करून तयार झाला राधिका मर्चंटचा सुंदर लेहेंगा... बघा त्याचं सौंदर्य

तिच्या या घागऱ्याचं डिझाईन प्रसिद्ध सेलिब्रिटी अबू जानी संदीप खोसला यांनी तयार केलं होतं तर त्याच्यावरचं पेटींग प्रसिद्ध शिल्पकार तसेच चित्रकार जयश्री बर्मन यांनी केलं.

सलग १ महिना रोज १६ तास पेंटींग करून तयार झाला राधिका मर्चंटचा सुंदर लेहेंगा... बघा त्याचं सौंदर्य

या घागऱ्यावर जवळपास १ महिना काम करण्यात आलं. दररोज १६- १६ तास बसून त्यावर अतिशय नजाकतीने पेंटींग करण्यात आलं. केवळ घागऱ्यावरच नाही तर ब्लाऊज आणि ओढणीवरही चित्रकलेचा अतिउत्कृष्ट नजारा दिसून आला. याविषयी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत जयश्री बर्मन म्हणाल्या की मी सलग १ महिना एखाद्या साधूने ध्यानधारणा करावी त्याप्रमाणे दिवस- रात्र हा लेहेंगा रंगविण्यात मी दंग झाले होते. त्यामुळे ते माझ्यासाठी एकप्रकारचं मेडिटेशनच होतं.

सलग १ महिना रोज १६ तास पेंटींग करून तयार झाला राधिका मर्चंटचा सुंदर लेहेंगा... बघा त्याचं सौंदर्य

या लेहेंग्यावर त्यांनी हत्ती, बदक आणि वेगवेगळ्या रुपातील स्त्रिया साकारल्या आहेत. त्या म्हणाल्या की लेहेंगा तयार करण्यापुर्वी त्यांना राधिकाचा फोन आला होता. त्यात ती म्हणाली होती की तिला आणि अनंतला जयश्री यांनी तयार केलेलं एक जुनं पोट्रेट अतिशय आवडतं. त्याचप्रमाणे राधिका हा तिच्या लग्नातला लेहेंगाही एक दिवस अशाच पद्धतीने फ्रेम करून ठेवणार आहे. केसांत कमळाची खरीखुरी फुलं माळून राधिकाने या लेहेंग्यावर साजेशी केशभुषा केली होती.

सलग १ महिना रोज १६ तास पेंटींग करून तयार झाला राधिका मर्चंटचा सुंदर लेहेंगा... बघा त्याचं सौंदर्य

त्यामुळे जयश्री यांनी इटालियन पद्धतीचा एक कपडा या लेहेंग्यासाठी वापरला. हा कपडा अधिक काळ टिकणारा आहे. लेहेंगा तयार झाल्यानंतर जेव्हा राधिकाने तो पाहिला तेव्हा ती अतिशय आनंदित झाली होती. ‘Oh my god, I can’t believe it’ असं म्हणत तिने चेहऱ्यावर हात ठेवले. तिची ही प्रतिक्रिया आणि तिचा चेहरा मी कधीच विसरू शकणार नाही, असं म्हणत जयश्री यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला.