Join us   

साध्याच ड्रेस मटेरियलपासून शिवा आकर्षक सलवार- कुर्ता, बघा स्मार्ट लूक देणारे सुंदर पॅटर्न्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2024 6:36 PM

1 / 7
सलवार कुर्ता हा ड्रेस सगळ्याच वयाेगटातल्या महिलांना शोभून दिसतो. अगदी कॅज्यूअल लूकपासून ते एखाद्या समारंभापर्यंत तो कुठेही अगदी सहज घालता येतो. (salwar kurta designs for woman)
2 / 7
आता सलवार- कुर्ता या प्रकारात तेच ते नेहमीचे पॅटर्न शिवून कंटाळला असाल तर हे काही फॅशनेबल, लेटेस्ट पॅटर्न बघा. यामुळे तुमच्या साध्याच ड्रेस मटेरियलपासून किती आकर्षक ड्रेस तयार होऊ शकतो ते लक्षात येईल..(latest fashionable patterns of salwar kurta)
3 / 7
हा एक पॅटर्न पाहा. असा अनारकली कुर्ता असला की त्यावर लेगिंन्स घालण्याची फॅशन होती. पण आता मात्र त्याखाली अशी मोकळीढाकळी पॅण्ट चालू शकते.
4 / 7
एखादं सिंथेटिक प्रकारातलं मटेरियल असेल अशा पद्धतीचा कट असणारा कुर्ता आणि त्याखाली पटियाला अशा पद्धतीचा ड्रेस शिवू शकता. (image credit- google))
5 / 7
सलवारचा कपडा प्लेन आणि कुर्त्याचा कपड भरजरी असेल तर अशा पद्धतीचा जॅकेट ड्रेस शिवू शकता. त्याखाली एखादी मॅचिंग लेगिंन्स घाला. स्मार्ट लूक मिळेल.
6 / 7
थोडं फॅन्सी ड्रेस मटेरियल असेल तर अशा पद्धतीचा गरारा पॅटर्न ड्रेसही तुम्ही शिवू शकता.
7 / 7
असा स्टॅण्ड कॉलर कुर्ता आणि त्याखाली पलाजो असा ड्रेस ऑफिसवेअरसाठी परफेक्ट आहे. कॉटनचं ड्रेस मटेरियल असेल तर हा पॅटर्न ट्राय करून पाहा.
टॅग्स : फॅशनस्टायलिंग टिप्स