Join us

सात पाऊलं-सात वचनं जन्मजन्मांतरीची! पाहा लग्नात सप्तपदींसाठी फुलांचे-सुपाऱ्यांचे अप्रतिम डेकोरेशन; सुंदर अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2025 17:15 IST

1 / 9
हिंदू धर्मात प्रत्येक विधीचे वेगवेगळे महत्त्व असते. हिंदू धर्मात सप्तपदीशिवाय लग्न कार्य अपूर्ण मानले जाते. सप्तपदीची सात वचन घेऊन नवरा- नवरी आपल्या भविष्याच्या गाठी बांधतात. (Saptapadi stage decoration ideas)
2 / 9
सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. या दिवसांची प्रत्येकजण आपल्या आयुष्यात वाट पाहात असतो. सप्तपदीच्या विधीसाठी आपण देखील काही नवीन युनिक डिझाइन्सचा विचार करत असाल तर हे सुंदर डेकोरेशन पाहा. (Traditional Saptapadi mandap decoration)
3 / 9
आपल्या विवाह सोहळ्याला आणखी खास करायचे असेल तर आपण सुपारीला वेगवेगळ्या पद्धतीने लावलेल्या डायमंडचा वापर करु शकतो. विड्याच्या पानांवर ही रंगबेरंगी सुपारी ठेवून आपल्या या स्पेशल दिवसात भर घालेल.
4 / 9
जर तुम्हाला सप्तपदीसाठी सुपारीचा वापर करायचा नसेल तर पान आणि फुलांच्या अनोख्या पद्धतीने ही विधी पार पाडू शकता. यामध्ये पानांवर झेंडूची फुले ठेवून डेकोरशनची शोभा वाढवू शकतात.
5 / 9
सध्या बाजारात सप्तपदीसाठी अनेक युनिक डेकोरेशन पाहायला मिळत आहे. यामध्ये सुपारीला वेगवेगळ्या रंगानी सजवलेले आहे. (saptapadi decor using marigolds and roses)
6 / 9
तांदूळ आणि फुलांपासून बनवलेले सप्तपदीचे डेकोरेशन हे दिसायला छान असते. यामध्ये आपण सप्तपदीच्या सात वचनांचा अर्थ देखील लिहू शकतो.
7 / 9
सप्तपदीच्या डेकोरेशनमध्ये झेंडूची पिवळी आणि पांढरी फुले वापरुन आपण त्यात सुपारी ठेवून या मंगलकार्याची सुरुवात करा.
8 / 9
आपल्या सप्तपदीच्या क्षणाला अधिक सुंदर करण्यासाठी आपण केळीच्या पानांमध्ये सात पावल ठेवून त्यावर सुपारी ठेवू शकतो. त्याच्या बाजूला सप्तपदीची सात वचन लिहून त्याचा अर्थ देखील सांगता येईल.
9 / 9
बाजारात सप्तपदीच्या विधीसाठी अनेक खास डिझाइन केलेल्या सुपाऱ्या मिळतात. जर तुम्हाला युनिक काही हवं असेल तर सुपारीला मोतीने आणि डायमंडने सजवू शकतो.
टॅग्स : फॅशन