‘या’ ९ रंगांच्या साड्या नेसा, साडी स्वस्त असली तरी मिळेल क्लासी-महागडा-श्रीमंत लूक...
Updated:December 18, 2024 16:12 IST2024-12-18T16:01:13+5:302024-12-18T16:12:58+5:30
Saree Colours That Give a Rich & Expensive Look : Saree Colours that Make you Look Expensive : Colors that make you look Rich & Elegant : Rich Look Sarees Colours : सेलिब्रिटींप्रमाणे तुम्हांलाही हवाय रिच आणि महागडा लूक तर या ९ रंगांच्या साड्या, आऊटफिट्सची करा निवड...

आपण अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना नेहमीच वेगवेगळ्या (Rich Look Sarees Colours) साडीत पाहतो. त्यांचा साडीतील लूक पाहून आपल्याला त्या साड्या फारच महागड्या असतील असे वाटते. काहीवेळा आपला असा समज होतो की, त्यांच्या साड्या खूप महागड्या असाव्यात, म्हणूनच त्या खूप सुंदर दिसतात. परंतु या मागचं सत्य हे आहे की, काही साड्या त्यांच्या रंगामुळे महाग दिसतात. आता तुम्ही विचार करत असाल की हे महागडे रंग (Saree Colours That Give a Rich & Expensive Look) कोणते आहेत ? पाहूयात असे मोजके रंग जे अगदी कमी किंमतीतही तुम्हाला महागडा आणि एकदम भारी रॉयल लूक देतील.
१. डार्क पर्पल (Dark Purple) :-
रोजच्या लाईफस्टाईलमध्ये डार्क पर्पल हा रंग आपण फार क्वचितच वेळी निवडतो. प्रत्यक्षात हा रंग अतिशय सुंदर आणि रॉयल लूक देतो. सिल्क, शिफॉन, जॉर्जेट, बनारसी अशा प्रत्येक फॅब्रिकमध्ये तुम्हाला या रंगाच्या साड्या मिळतील.
२. एमेरल्ड ग्रीन (Emerald Green) :-
एमेरल्ड ग्रीन कलरची साडी खूपच सुंदर दिसते. साडीतील हा रंग तुम्हाला अगदी रॉयल आणि महागडा लूक देऊ शकतो. सिल्क आणि जॉर्जेटच्या फॅब्रिकमध्ये हा रंग अतिशय खुलून दिसतो.
३. रॉयल ब्लू (Royal Blue) :-
ज्याच्या नावातच रॉयल आहे असा रॉयल ब्लू रंग तुम्हांला महागडा लूक देऊ शकतो. लग्नसराई, रिसेप्शन अशा अनेक खास प्रसंगी रॉयल ब्लू रंगाची साडी ही चारचौघीत उठूनच दिसते.
४. रिच बर्गन्डी (Rich Burgundy) :-
बरगंडी रंग इतका सुंदर आहे की कोणालाही तो तितकाच सुंदर दिसू शकतो. रिच बर्गन्डी रंग तुम्हाला कोणत्याही फंक्शनला महागडा एक्स्पेन्सिव्ह लूक देऊ शकतो.
५. गोल्डन (Golden) :-
गोल्डन रंग हा मुळातच रिच लूक देणारा असल्याने तो सगळ्या फंक्शनला अगदी परफेक्ट शोभून दिसतो. सुरुवातील तुम्हाला हा रंग खूपच फिका वाटेल परंतु साडी नेसल्यावर महागडा लूक येईल.
६. कॉपर (Copper) :-
साड्यांच्या अनेक रंगामध्ये कॉपर कलर तुम्हाला महागडा लूक देऊ शकतो. या रंगाची साडी तुम्ही कोणत्याही फॅब्रिकमध्ये खरेदी करू शकता.
७. सिल्वर (Silver) :-
सिल्व्हर कलरची साडी एवढी रॉयल दिसू शकते याचा आपण कधी विचारही केला नसेल. गोल्डन आणि कॉपर रंगाप्रमाणेच हा नवीन सिल्वर रंग देखील तुमच्या खास क्षणांना तुम्हाला रॉयल लूक देऊ शकतो.
८. रॉयल रेड( Royal Red) :-
लाल रंग हा सर्वात उठून दिसणारा असा रंग आहे त्यामुळे अशा रॉयल रेड रंगाच्या साड्या आपल्याकडे खास फंक्शनला नेसल्या जातात. त्याचबरोबर, तुमच्या साडीचा रिच लूक दिसण्यासाठी रॉयल रेड हा अगदी परफेक्ट रंग आहे.
९. पांढरा (White) :-
इतर रिच रंगांप्रमाणेच पांढरा रंग देखील तुम्हांला रॉयल आणि रिच लूक देऊ शकतो.