1 / 7उन्हाळ्यात शक्यतो आपण (Best Saree Fabrics for Summer Season) मोकळेढाकळे, कम्फर्टेबल (Saree Fabrics to Beat the Heat Top 5 Saree Fabrics for Summer) आणि घाम शोषून घेणारे असेच कपडे घालणे पसंत करतो. उन्हाळ्यात अंगाला येणाऱ्या घामामुळे अंगाला चिकटणारे किंवा फिटिंगचे कपडे फारसे कुणाला आवडत नाही. यातही जर तुम्ही नेहमीच्या वापरासाठी साड्या नेसत असाल तर दिवसभर या उकाड्यात साडी नेसून राहणे म्हणजे जरा अवघडच आहे. यासाठी, उन्हाळ्यात आपण हलक्या - फुलक्या तसेच घाम शोषून घेणाऱ्या अशा फॅब्रिक्सची निवड करतो. 2 / 7उन्हाळ्यात जर का तुम्हाला दिवसभर (The Best Saree Fabrics to Beat the Heat This Summer) साडी नेसून इतरही काम करायची असल्यास तुम्ही, नेमक्या कोणत्या फॅब्रिक्सच्या साड्या नेसू शकता ते पाहूयात. 3 / 7उन्हाळ्यासाठी कॉटनच्या फॅब्रिकची साडी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. कॉटन फॅब्रिक हे वजनाने हलके, आरामदायी आणि त्वचेला अनुकूल असे असते. कॉटन फॅब्रिक्सचे कपडे घातल्याने किंवा साड्या नेसल्याने तुम्हाला उन्हाळयात देखील अगदी कम्फर्टेबल वाटते. अशा प्रकारच्या कॉटनच्या साड्या नेसून तुम्ही दिवसभर तुमचे काम आरामात करू शकता. यंदाच्या उन्हाळ्यात तुम्ही पेस्टल शेड्स, पांढरा, मिंट ग्रीन आणि लव्हेंडर अशा हलक्या रंगांच्या कॉटन साड्या नेसू शकता. 4 / 7कॉटनप्रमाणेच उन्हाळ्याच्या दिवसांत लिनेन फॅब्रिकचे कपडे घालण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. लिनेन फॅब्रिक केवळ हलकेच नाही तर त्याचे टेक्श्चर फिनिश तुमचा लूक अधिक एथनिक आणि क्लासी बनवण्यास मदत करतो. लिनेन फॅब्रिकच्या साड्या बहुतेकदा सॉलिड रंगात येतात, ज्या तुम्ही मिनिमलिस्ट दागिन्यांसोबत स्टाईल करू शकता.5 / 7उन्हाळ्यात मसलिन किंवा रेशमी फॅब्रिकची साडी नेसण्यासाठी खूप हलकी आणि हवेशीर असते. हे कापड केवळ थंड आणि आरामदायी नाही तर या कापडापासून तयार झालेली साडी नेसायला देखील सोपी असते. तुम्ही फ्लोरल प्रिंट किंवा भौमितिक डिझाइनच्या मलमलच्या साड्या नेसू शकता. उन्हाळ्याच्या सिझनमध्ये जर तुम्हाला पार्टी किस्वा एखादे खास फंक्शन अटेंड करायचे असेल तर मसलिन फॅब्रिकची साडी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. 6 / 7 उन्हाळ्यात चिकनकारी वर्क असलेल्या साड्यानेसायला महिलांना विशेषतः आवडते. चिकनकारी फॅब्रिक्स केवळ हलकेच नाहीत तर त्यावरील भरतकाम तुमचा लूक हटके करण्यास मदत करते. तुम्ही पीच, पावडर ब्लू आणि ऑफ-व्हाइट अशा हलक्या रंगांच्या चिकनकारी साड्या ट्राय करू शकता.7 / 7जर तुम्ही उन्हाळ्यात एखादा लग्नसमारंभ किंवा पार्टीला जाण्याचा विचार करत असाल तर जॉर्जेट साडी हा उत्तम पर्याय असू शकतो. हे फॅब्रिक हलके आणि कम्फर्टेबल असते, जे उन्हाळ्यात घालण्यास आरामदायी आहे. तुम्ही हलक्या रंगाच्या आणि मेटॅलिक वर्क असलेल्या जॉर्जेट साड्या ट्राय करू शकता. यासोबतच, तुम्ही उन्हाळ्याच्या सिझनमध्ये टिश्यू आणि ऑर्गेन्झा फॅब्रिक्सच्या साड्या देखील नेसू शकता.