Join us

चमचमत्या सिक्विन साडी साडीचा पाहा झगमगता ट्रेंड! किंमत १ हजाराहून पुढे, स्टायलिश-सुंदर साडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 18:56 IST

1 / 8
सतत फॅशनचे ट्रेंड बदलत असतात. काही तरी नवीन फॅशन येत असते. लोक मनापासून ती फॉलो ही करतात. नवीन प्रकारचे कपडे घालणे तसेच आजूबाजूला लोकांनी काय फॉलो केले आहे ते पाहून आपणही ट्रेंड फॉलो करतो.
2 / 8
मात्र भारतामध्ये कितीही नवीन ट्रेंड आले वेस्टर्न कपड्यांमध्ये कितीही वैविध्य आले तरी एक प्रकार असा आहे जो वर्षानुवर्षे चालत आला आहे आणि तसाच चालत राहील. हा प्रकार म्हणजे साडी.
3 / 8
सणावाराला कोणताही ट्रेंडींग ड्रेस आपण वापरत नाही. साडीलाच प्राधान्य देतो. मात्र या साडीचे ही अनेक प्रकार आहेत. आपले पारंपारिक प्रकार आहेतच तसेच नवेही काही प्रकार आहेत.
4 / 8
सध्या सगळ्या अभिनेत्री छान झगमगत्या साड्या वापरताना दिसतात. या साडी प्रकाराचे नाव सिक्विन असे आहे. सिक्विन हा फार नवीन असा काही ट्रेंड नाही. आधीही अशा साड्या वापरल्या जायच्या. मात्र हा ट्रेंड पुन्हा जोर पकडत आहे.
5 / 8
फक्त अभिनेत्री नाही तर सगळ्यांनाच अशा साड्या आवडायला लागल्या आहेत. साडीवर फार काही दागिने घातले नाहीत तरी चालते. कारण साडीचीच चमक भरपूर असते.
6 / 8
या साडीमध्ये सिल्कच्या कापडाचा वापर जास्त केलेला आढळून येतो. बनारसी सिल्कमध्येही सिक्विन साडी फार सुंदर दिसते.
7 / 8
साध्यातली सिक्विन साडी हजारापासून मिळते. तुम्हीही नक्की वापरून बघा. ऑनलाईन विविध साईट्सवर भरपूर व्हरायटी मिळेल.
8 / 8
तसेच बाजारात जाऊनही विकत घेऊ शकता. सिक्विन साडी भारतभर उपलब्ध आहे. सिक्विनचा ट्रेंड आत्ता जोमात असला तरी साडी फार जुनी असल्यामुळे महिलांच्या ओळखीचा पॅटर्न आहे.
टॅग्स : साडी नेसणेफॅशनव्हायरल फोटोज्जान्हवी कपूर