Join us   

सात वर्षे-सात साड्या, निर्मला सीतारामन यांनी बजेटसाठी निवडलेली प्रत्येक साडी खास, हातमागालाही सलाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2024 6:58 PM

1 / 8
निर्मला सीतारामन यांनी या वर्षी सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. संसदेत अर्थसंकल्प सादर होताच व्हायरल चर्चा असते ती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साड्यांची. साधं आहे त्यांचं राहणीमान. मात्र दरवर्षी त्यांची साडी मात्र वेगळी आणि भारतीय हातमागाची महान परंपरा अधोरेखीत करते. आजवरच्या त्यांच्या साड्या हातमागाला प्रोत्साहनाची आणि भारतीय कलेच्या अभिमानाचीच गोष्ट सांगतात(Sitharaman's seven sarees in seven Budgets).
2 / 8
१. २०१९ साली निर्मला सीतारामन यांनी गुलाबी रंगाची मंगलगिरी साडी नेसली होती. ही साडी अतिशय तलम सुतापासून तयार केली जाते. आंध्रप्रदेशातील मंगलगिरी गावात या साड्यांची निर्मिती केली जाते.
3 / 8
२. २०२० साली सीतारामन यांनी पिवळ्या रंगाची सिल्कची साडी परिधान केली होती. सोनेरी रंगांच्या रेशीम किड्यांपासून तयार झालेल्या रेशमाने ही साडी तयार झाली होती. पिवळा रंग उत्साह उर्जेचे प्रतीक मानले जाते.
4 / 8
३. २०२१ साली लाल रंगाची इक्कत बॉर्डर असलेली पोचमपल्ली साडी नेसली होती. पोचमपल्ली साडी हातमाग साड्यात अतिशय लोकप्रिय आहे.
5 / 8
४. २०२२ साली कॉफी कलरची हॅन्डलूम सिल्क प्रकारांतील होती. ही साडी तपकिरी मरुन रंगाची होती. चमकदार तपकिरी रंगाच्या साडीला मरुन किंवा डार्क चॉकलेटी म्हणता येईल अशा रंगांचे काठ होते.
6 / 8
५. २०२३ साली निर्मला सीतारामन यांनी लाल रंगाची सिल्क इरकल साडी नेसली होती. धारवाडची ओळख असणाऱ्या या साडीचे काठ काळ्या रंगाचे होते आणि त्यावर सोनेरी रंगांचे विणकाम केले होते
7 / 8
६. २०२४ साली निळसर रंगाची टसर सिल्क साडी, त्यावर सुंदर असे कांथावर्क करण्यात आले होते. त्यांनी नेसलेल्या या साडीचा रंग दक्षिण भारतात 'Ramar Blue' या ओळखला जातो.
8 / 8
७. यावेळी अर्थसंकल्पा दरम्यान निर्मला सीतारामन पांढरी -व्हायलेट रंगाची चेक्सची साडी होती. तिला गोल्डन प्रिंटेड बॉर्डर आहे.
टॅग्स : फॅशननिर्मला सीतारामन