समर स्पेशल : साडीवर हवेच स्लिव्ह्जलेस ब्लाऊज! पाहा ९ स्टायलिश डिझाइन्स, सुंदर आणि मोहकह
Updated:March 20, 2025 17:07 IST2025-03-20T15:39:24+5:302025-03-20T17:07:59+5:30

ऋतू बदलला की फॅशन बदलते. आता हेच पाहा ना हिवाळ्यात लांब बाह्यांच्या ब्लाऊजची फॅशन असते. तर उन्हाळ्यात स्लिव्हलेस बाह्यांचा ट्रेंड असतो.(sleeveless blouse designs)
म्हणूनच जर तुम्हाला ट्रेंडनुसार स्टायलिश पद्धतीने साड्या नेसायच्या असतील तर सगळ्यात आधी तुमच्याकडच्या काही साड्यांवर स्लिव्हलेस ब्लाऊज शिवून घ्या.(latest patterns in sleeveless blouse)
त्यासाठीच बघा हे काही खास डिझाईन्स आणि करा सुंदर, स्टायलिश, ट्रेण्डी लूक..(sleeveless blouse designs for summer)
समोरच्या बाजूने हूक किंवा बटन लावण्याऐवजी अशा पद्धतीची चेन लावूनही छान लूक येतो. काही जणी त्या चेनच्या वरच्या बाजुला साडीवर शोभून दिसेल असं लटकन लावतात.. ते ही खूप वेगळा लूक देतं.
स्टँड कॉलर आणि समोरच्या बाजुने डिप V नेक.. अशा पद्धतीचे ब्लाऊजही आकर्षक लूक देते.
ऑफिसमध्ये घालण्यासाठी कसं ब्लाऊज डिझाईन निवडावं, याच्या शोधात असाल तर हा एक लूक बघा... या पद्धतीच्या ब्लाऊजमध्ये अगदी फॉर्मल लूक मिळतो.
या पद्धतीचे ब्लाऊज थोडेसे फॅशनेबल वाटतात. स्लिव्हलेस प्रकारातच थोडं वेगळेपण पाहिजे असेल तर या पद्धतीचं ब्लाऊज डिझाईन ट्राय करू शकता.
एखाद्या समारंभासाठी किंवा पार्टीसाठी घालायला अशा पद्धतीचा एखादा ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवा.
अगदीच स्लिव्हलेस ब्लाऊज आवडत नसतील तर अशा पद्धतीच्या मेगा स्लिव्ह्ज किंवा बाह्यांना छोटीशी झालर लावलेले ब्लाऊजही तुम्ही घालू शकता.