कॉटन साडीत तुमचा लूक अधिक खुलविणारे ७ ब्लाऊज डिझाईन्स, दिसाल एकदम स्टायलिश- रुबाबदार
Updated:January 25, 2025 16:39 IST2025-01-25T16:31:22+5:302025-01-25T16:39:03+5:30

कॉटन साडी नेसताना ब्लाऊजची निवड खूप चोखंदळपणे करावी लागते. कारण ब्लाऊजची निवड चुकली तर स्मार्ट लूक येण्याऐवजी तुम्ही आणखीनच गबाळे आणि प्रौढ दिसू शकता.
त्यामुळेच कॉटन साडी नेसणार असाल तर त्यावर अशा पद्धतचे थोडे वेगळे आणि आकर्षक ब्लाऊज शिवा.
काॅटन साडीवर अशा पद्धतीचं लांब बाह्यांचं ब्लाऊज खूप छान दिसतं. पण ते ब्लाऊज तुमच्या दंडावर अगदी परफेक्ट मापात बसलं पाहिजे. दंडावर ब्लाऊज सैलसर झालं तर ते अजिबातच चांगलं दिसत नाही.
बोटनेक ब्लाऊज आणि कोपऱ्यापर्यंत लांब बाह्या या पॅटर्नचं ब्लाऊज कॉटन साड्यांवर खूप खुलून दिसतं.
कॉटनची साडी असल्यास मागच्या बाजुने गळाबंद असणारं ब्लाऊज खूप छान लूक देतं. अशा पद्धतीचं वेगळं डिझाईन तुम्ही मागच्या गळ्यासाठी निवडू शकता.
ऑफिसमध्ये कॉटनच्या साड्या नेसणार असाल तर अशा पद्धतीचं टर्टल नेक ब्लाऊज शिवा आणि त्याला समोरच्या बाजुने बटन लावा. एकदम फॉर्मल लूक मिळून चारचौघांवर तुमची नक्कीच छाप पडेल.
मागच्या बाजुने बंद गळा आणि पुढच्या बाजुने डिप यू किंवा डिप व्ही पद्धतीचा गळाही छान दिसतो.
ऑफिसवेअर काॅटन साडीसाठी असं स्टॅण्ड कॉलरचं ब्लाऊजही तुम्हाला एकदम स्मार्ट लूक देतं.
कधीतरी कॉटनच्या साडीवर असं कॉन्ट्रास्ट रंगाचं वेलवेट ब्लाऊजही ट्राय करून पाहा. छान दिसेल.