1 / 9कॉटन साडी नेसताना ब्लाऊजची निवड खूप चोखंदळपणे करावी लागते. कारण ब्लाऊजची निवड चुकली तर स्मार्ट लूक येण्याऐवजी तुम्ही आणखीनच गबाळे आणि प्रौढ दिसू शकता. 2 / 9त्यामुळेच कॉटन साडी नेसणार असाल तर त्यावर अशा पद्धतचे थोडे वेगळे आणि आकर्षक ब्लाऊज शिवा.3 / 9काॅटन साडीवर अशा पद्धतीचं लांब बाह्यांचं ब्लाऊज खूप छान दिसतं. पण ते ब्लाऊज तुमच्या दंडावर अगदी परफेक्ट मापात बसलं पाहिजे. दंडावर ब्लाऊज सैलसर झालं तर ते अजिबातच चांगलं दिसत नाही. 4 / 9बोटनेक ब्लाऊज आणि कोपऱ्यापर्यंत लांब बाह्या या पॅटर्नचं ब्लाऊज कॉटन साड्यांवर खूप खुलून दिसतं.5 / 9कॉटनची साडी असल्यास मागच्या बाजुने गळाबंद असणारं ब्लाऊज खूप छान लूक देतं. अशा पद्धतीचं वेगळं डिझाईन तुम्ही मागच्या गळ्यासाठी निवडू शकता.6 / 9ऑफिसमध्ये कॉटनच्या साड्या नेसणार असाल तर अशा पद्धतीचं टर्टल नेक ब्लाऊज शिवा आणि त्याला समोरच्या बाजुने बटन लावा. एकदम फॉर्मल लूक मिळून चारचौघांवर तुमची नक्कीच छाप पडेल. 7 / 9मागच्या बाजुने बंद गळा आणि पुढच्या बाजुने डिप यू किंवा डिप व्ही पद्धतीचा गळाही छान दिसतो. 8 / 9ऑफिसवेअर काॅटन साडीसाठी असं स्टॅण्ड कॉलरचं ब्लाऊजही तुम्हाला एकदम स्मार्ट लूक देतं.9 / 9कधीतरी कॉटनच्या साडीवर असं कॉन्ट्रास्ट रंगाचं वेलवेट ब्लाऊजही ट्राय करून पाहा. छान दिसेल.