Stylish full sleeves blouse designs for winter wedding, Latest fashion of full sleeves blouse
स्टायलिश लूक देणारे लेटेस्ट फॅशनचे लांब बाह्यांचे ब्लाऊज, ७ सुंदर डिझाईन्स- ट्राय करून पाहाPublished:February 6, 2024 03:19 PM2024-02-06T15:19:52+5:302024-02-06T15:23:37+5:30Join usJoin usNext स्लिव्हलेस, छोट्या बाह्यांचे, कोपऱ्यापर्यंत बाह्या असणारे ब्लाऊज नेहमीच असतात. आता असे पूर्ण बाह्यांचे ब्लाऊज घालून पाहा. हिवाळ्यात तर असे लांब बाह्यांचे ब्लाऊज खूप ट्रेण्डी असतात. ब्लाऊजची ही एक फॅशन पाहा. कोपऱ्यापर्यंत पूर्ण घट्ट बाह्या आणि त्याच्याखाली नाजूक झालर. अशा पद्धतीचं ब्लाऊजही अतिशय आकर्षक लूक देतं. प्लेन साडी असेल तर अशा पद्धतीचं एखादं एम्ब्रॉयडरीचं ब्लाऊज घालून पाहा. काठपदराच्या साडीवर असं ब्रासो कपड्याचं पूर्ण बाह्यांचे ब्लाऊजही छान दिसतं. यासाठी साडी मात्र खूप हेवी वर्कची नसावी. एखादी साधीच शिफॉन साडी असेल, पण त्यावरचं ब्लाऊज मात्र असं थोडं स्टायलिश शिवलं तर तुमचा लूक नक्कीच बदलू शकतो. असं एखादं डिझायनर ब्लाऊजही आपल्या कलेक्शनमध्ये असावं. काळं, लाल, गुलाबी, हिरवं असं ब्लाऊज घ्या, म्हणजे ते बऱ्याचशा साड्यांवर चालेल. सेक्विन वर्कची फॅशन सध्या खूप आहे. त्यामुळे असं एखादं ब्लाऊज घ्या. डिझायनर साड्यांवर हे ब्लाऊज खूप छान लूक देईल. अशा पद्धतीचे ब्लाऊज काठपदर साडी आणि डिझायनर साडी या दोन्हींवरही छान दिसतात. टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्ससाडी नेसणेfashionBeauty Tipssaree draping