डिझायनर साडीवर शिवून घ्या सुहाना खानसारखे सुपरस्टायलिश ब्लाऊज, बघा एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स
Updated:December 28, 2024 16:45 IST2024-12-28T16:34:11+5:302024-12-28T16:45:57+5:30

शाहरुख खानची लेक सुहाना खान हिच्या स्टाईलची, फॅशनची सोशल मिडीयावर बरीच चर्चा असते.
अशीच चर्चा होते ती तिच्या साडी लूकची. सुहाना बऱ्याचदा साडीमध्येच दिसून येते. सुंदर साडी, स्टायलिश ब्लाऊज आणि त्यावर साजेसा मेकअप आणि हेअरस्टाईल यामुळे सुहाना नेहमीच सगळ्यांमध्ये उठून दिसते.
म्हणूनच तुम्हालाही तुमच्याकडच्या एखाद्या डिझायनर साडीवर तुमचा लूक बदलवून टाकणारं एकदम स्टायलिश ब्लाऊज शिवायचं असेल तर सुहाना खानच्या ब्लाऊजच्या या काही डिझाईन्सचा विचार नक्कीच करू शकता.
समोरचा गळा आणि मागचा गळा वेगळ्या पद्धतीने घेऊन शिवलेलं हे एक सुंदर ब्लाऊज पार्टी, रिसेप्शन अशा कार्यक्रमांना घालायला छान आहे.
स्लिव्हलेस ब्लाऊज असलं तरी ते अशा पद्धतीने अगदी वेगळ्या स्वरुपात शिवता येतं..
स्लिव्हलेस ब्लाऊज आवडत असतील तर त्यातला हा एक पॅटर्नही छान आहे. तब्येत अगदीच शिडशिडीत असेल तर छान शोभून दिसेल. कॉलेजगोईंग तरुणींनाही हे ब्लाऊज छान वाटेल.
स्लिव्हलेस ब्लाऊज असलं तरी त्याला असं खाद्यांवर मोत्याचं, मण्यांचं लटकन लावून एक वेगळा लूक देता येतो.