1 / 8डब्लूडब्लूई सुपरस्टार जॉन सीनाने संपूर्ण जगात आपले नाव गाजवलं आहे. २००२ मध्ये २५ वर्षीय जॉन सीनाने स्मॅकडाउनच्या एका एपिसोडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर, २० वर्ष जॉन सीनाने चाहत्यांचे खूप मनोरंजन केले आणि १६ वेळा चॅम्पियन बनला. ४५ वर्षीय जॉन आता रिंगमध्ये क्वचितच दिसतो आणि त्याने बराच काळ एकही सामना जिंकलेला नाही. आता त्याचा बराचसा वेळ हॉलिवूड चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतो. रिंगणात चर्चेत असणारा जॉन आता आपल्या कपड्यांमुळे प्रकाशझोतात आला आहे. त्याचा स्कर्टवरील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. 2 / 8जॉनचा डब्लूडब्लूईमधील फायटिंगच्या रिंगणातला रुबाब पाहण्यासारखा असायचा. त्याचे कपडे सोशल मिडीयावर चर्चेत असायचे. नुकताच जॉनचा एक फोटो खूप व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्यांनी स्कर्ट आणि हील्स घालून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.3 / 8हॉलिवूडमधील त्याच्या भूमिकेचे चाहत्यांकडून नेहमीच कौतुक केले जाते. जॉन सध्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये रिकी स्टॅनिकी या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात तीन मित्रांची काल्पनिक पात्रं आहेत. या चित्रपटात जॉन सीना, झॅक एफ्रॉन आणि जर्मेन फॉलर मुख्य भूमिकेत दिसतील. 4 / 8रिकी स्टॅनिकी या चित्रपटासाठी जॉनने हा पोशाख परिधान केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक पीटर फॅरेली करणार आहेत आणि लेखन जेफ बुशेल यांचे आहे. या सिनेमात जॉन कॉमेडी भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या या भुमिकेसाठी त्यांनी स्कर्ट आणि हील्स परिधान केले आहे.5 / 8जॉन सीना यांनी तर आपल्या चित्रपटातील भुमिकेसाठी स्कर्ट आणि हिल्स परिधान केले आहेत. मात्र, हॉलिवूड आणि बॉलिवूडचे असे देखील काही अभिनेते आहेत, त्यांनी शो अथवा कार्यक्रमांसाठी स्कर्ट परिधान केले आहे. त्यात पहिले नाव येते डॅशिंग कलाकार रणवीर सिंहचे, त्याने आतापर्यंत हटके स्टाईल करून लोकांना नेहमीच अचंबित केले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रणवीर सिंहने ग्रीन स्कर्ट परीधान केला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता.6 / 8हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पिटने चित्रपटाच्या प्रीमियरसाठी स्कर्ट परिधान केला होता. त्याने गुडघ्यापर्यंतचा काळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केला होता. त्याने स्कर्टवर शर्ट आणि ब्लेजर परिधान कॅरी केला होता. स्कर्टवरील त्यांचा हा फोटो सोशल मिडीयावर प्रचंड चर्चेत आला होता.7 / 8फास्ट अँड फ्युरियस या चित्रपटातील मुख्य कलाकार विन डिझल आपल्या स्टाईलसाठी ओळखले जातात. त्याने एका पुरस्कार सोहळ्यात छान लेदर बॅल्क स्कर्ट परिधान केला होता. हा कार्यक्रम स्कॉटलंडमध्ये पार पडला. त्याचे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले होते. 8 / 8बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आपल्या अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने जेंडर - न्यूट्रल ट्रेंडला फॉलो केलं आहे. आयुष्मानने पारंपारिक परंतु आधुनिक मोनोक्रोम लुक कॅरी केला आहे. ज्यात ब्लॅक स्कर्टसह त्याने ब्लॅक ब्लेजर परिधान केला होता.