Join us   

थंडीच्या दिवसांतही दिसा फॅशनेबल, पाहा स्वेटर-जॅकेटचे एकसे एक पॅटर्न्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 12:42 PM

1 / 6
थंडीच्या दिवसांत हवेत गारवा असल्याने आपण साहजिकच स्वेटर वापरतो. स्वेटरमध्येही फॅशनेबल दिसायचं असेल आणि स्वत:ला छान कॅरी करायचं असेल तर स्वेटरचे एक से एक पॅटर्न आपण ट्राय करायला हवेत. थंडीचे दिवस जवळ आले की आपण कपाटातले जाड कपडे, स्वेटर, जॅकेट सगळं बाहेर काढतो. पाहूयात स्वेटर्सचे असेच काही हटके पर्याय (Sweater Patterns for Winter Season).
2 / 6
ऑफीसमध्ये फॉर्मल वेअर वाटतील असे लोकरीचे पोलो नेक शर्ट अतिशय छान दिसतात. यामध्ये साधारणपणे पेस्टल रंग असल्याने आपण कोणत्याही रंगाच्या पँटवर हे स्वेट शर्टसारखे स्वेटर घालू शकतो. गळ्यापर्यंत असल्याने आणि बाह्याही पूर्ण असल्याने थंडीपासूनही चांगले संरक्षण होते.
3 / 6
थंडी म्हटली की आपण लोकरीचे कपडे वापरतोच. पण त्याचप्रमाणे क्रोशाचे कपडेही तितकीच छान उब देतात. सध्या बाजारात क्रोशाचे वेगवेगळे टॉप्स किंवा फॅशनेबल जॅकेटस पाहायला मिळतात. दिसायला ते जास्त जाळीदार दिसत असले तरी त्यामध्ये अतिशय चांगली उब असते. त्यामुळे खूप जास्त थंडी नसेल त्यावेळी हे क्रोशाचे कपडे आपण नक्की वापरु शकतो.
4 / 6
स्वेटर किंवा जॅकेट म्हटले की ते अनेकदा कंबरेपर्यंतच असतात. त्यामुळे आपल्या अर्ध्या शरीराचे थंडी वाजण्यापासून संरक्षण होते. मात्र आपल्या पायांना, मांड्यांना थंडी वाजतेच. अशावेळी असे लॉंग जॅकेट असेल तर ते छान दिसते. तसेच आपण अनेकदा कुर्ते घालतो, त्यावर हे जॅकेट अगदीच छान दिसते.
5 / 6
तुम्ही कुठे आऊटींगला जात असाल किंवा ऑफीसमध्येही तुम्ही शॉर्ट ड्रेस कॅरी करत असाल तर वूलनचे अशाप्रकारचे शॉर्ट ड्रेस मस्त दिसतात. यावर तुम्हाला वाटले तर तुम्ही जीन्सही पेअर करु शकता. बाजारात सध्या असे फॅशनेबल कपडे सहज उपलब्ध असतात, फक्त आपण ते योग्य पद्धतीने निवडायला हवेत.
6 / 6
जॅकेट हा थंडीत कॅरी करण्याचा सगळ्यात सोपा पर्याय आहे. एका ठिकाणहून दुसरीकडे जाताना बाहेर आपल्याला थंडी वाजते. मात्र एकदा ऑफीसला किंवा एखाद्या बंद जागी गेल्यावर आपल्याला गरम व्हायला लागते. अशावेळी जॅकेट अंगावरुन उतरवणे सोपे असल्याने ते वापरायला सोयीस्कर ठरते. बाजारात वेगवेगळ्या पॅटर्नची बरीच जॅकेटस मिळत असून तुम्ही ती नक्की ट्राय करु शकता.
टॅग्स : फॅशनखरेदीथंडीत त्वचेची काळजी