तापसी पन्नूची पाहा खास स्टाईल ब्लाऊजऐवजी शर्ट घालून नेसली साडी, बदलला लूक आणि दिसते सुंदर... Published:August 17, 2024 09:28 PM 2024-08-17T21:28:57+5:30 2024-08-17T21:49:34+5:30
Taapsee Pannu redefining blouse for woman by wearing denim shirt or vest with saree : तापसीने साडीच्या ब्लाऊजला थोडे ट्विस्ट देत हटके फॅशन ट्रेंड तयार केला आहे... बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. कधी ट्रेंडिंग विषयावरील तिच्या कमेंट्समुळे, तर कधी चित्रपटातील दमदार अभिनयामुळे तर काहीवेळा तिच्या अनोख्या हटके फॅशन ट्रेंडमुळे ती सतत प्रकाश झोतात असते. तापसी तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्यात अशा काही हटके गोष्टी करते की ज्यामुळे ती नेहमी चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरते. आपल्या अभिनयाने फॅनफॉलोअर्सची मने जिंकणारी तापसी पन्नू फक्त चांगल्या भूमिकाच करत नाही तर आपल्या फॅशनकडे देखील तितकेच लक्ष देते. तापसी जेवढी मेहेनत आपल्या अभिनयासाठी घेते तेवढीच मेहेनत ती आपल्या फॅशन स्टेटमेंट्स साठी घेताना दिसून येते. सगळ्यांचीही दिलरुबा असणाऱ्या तापसीने साडीवरील ब्लाऊजची व्याख्याच बदलून टाकली आहे. तिने साडीच्या ब्लाऊजला थोडे ट्विस्ट देत हटके फॅशन ट्रेंड तयार केला आहे. तापसीचा हा अनोखा फॅशन ट्रेंड नेमका काय आहे ते पाहूयात (Taapsee Pannu redefining blouse for woman by wearing denim shirt or vest with saree ).
१.स्ट्रॅपी टॉपवर साडी :-
तापसी पन्नूने रंगीबेरंगी फुलाफुलांच्या स्ट्रॅपी टॉपवर गडद निळ्या रंगाची कॉटनची साडी नेसली आहे. तिने नेहमीच्या साडीच्या ब्लाऊज ऐवजी फ्लोरल स्ट्रॅपी क्रॉप टॉप घालून त्यावर साडी नेसली आहे. तापसीने साडीचा पदर पारंपारिकपणे खांद्यावर गुंडाळला आहे.
२. काळ्या टॉपवर साडी :-
तापसीने काळ्या रंगांच्या टॉपवर लाल रंगाची धोती स्टाईल साडी नेसली आहे. काळे पोलका डॉट्स असलेली गुलाबी मुल्मुल कॉटनची साडी नेसली आहे.
३. डेनिम शर्ट सोबत साडी :-
तापसीने ब्लाऊजच्या संकल्पनेला छेद देत ब्लाऊजच्या जागी शर्ट्स घालून हटके फॅशन केली आहे. तिने डेनिम शर्टवर पिवळ्या रंगांची वाघाच्या चेहरा असलेल्या प्रिंटची साडी नेसली आहे.
४. ब्लाउज ऐवजी शर्ट घातला :-
तापसीचा हा लूक खूपच हटके आहे. ज्यामध्ये तिने पांढऱ्या क्रॉप शर्टसह काळ्या आणि पांढऱ्या रंगाची प्रिंटेड साडी नेसली आहे. तिचा शर्ट तळाशी कट असणारा आहे त्याचबरोबर शर्टाची बाही दुमडलेली आहे आणि सर्व बटणे बंद ठेवली आहेत. त्याच वेळी, तिने काळे शूज आणि पांढरे मोजे घातले आहेत. हे पाहून तुम्हालाही तुमचे शाळेचे दिवस आठवतील.
५. कोटवर नेसली साडी :-
तापसीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. ज्यामध्ये तिने ब्लाउज ऐवजी पांढऱ्या रंगाचा कमर कोट घातला होता आणि कोटच्या आतून तिचा पल्लू स्टाइल केला आहे. इतकेच नाही तर मागच्या बाजूला बो डिटेलिंग देण्यात आले आहे, जे याला आणखी क्लासी लुक देत आहे. बॉडी हगिंग स्कर्ट लुक देणारी ही साडी लिटल ब्लॅक बो लेबलची आहे.
६. वेस कोटसोबत साडी :-
तापसीने सुता लेबलची सुंदर हिरव्या आणि गुलाबी फुलांची प्रिंट असलेली कॉटनची साडी नेसली आहे. ब्लाउज ऐवजी तापसीने व्हाईट वेस कोट घातला होता. तिची ही कॉटनची साडी साध्या हिरव्या रंगाची आहे त्याचबरोबर तिच्या पदरावरील प्रिंट अप्रतिम दिसत होती.