1 / 8लग्नकार्यात आपण हेवी दागिने घालतोच. आता अशा पद्धतीचा एकच अगदी ठसठशीत दागिना घालण्याचा ट्रेण्ड आला आहे. हे दागिने टेम्पल ज्वेलरी म्हणून ओळखले जातात.2 / 8काही ठिकाणी या दागिन्यांना साऊथ ज्वेलरी म्हणूनही ओळखले जाते. कारण दक्षिणेकडे असे मोठे दागिने जास्त प्रमाणात घातले जातात.3 / 8या दागिन्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय ठसठशीत असतात. शिवाय त्यांच्यावर लक्ष्मी, गणपती, बालाजी अशा देवांच्या मुर्तीसुद्धा असतात. 4 / 8हे दागिने तुम्ही सोन्यातूनही घडवून घेऊ शकता किंवा मग ऑनलाईन शॉपिंग साईटवर किंवा तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारपेठांमध्येही ते मिळतात.5 / 8हल्ली चांदीमध्येही अशा प्रकारच्या टेम्पल ज्वेलरीचे कित्येक वेगवेगळे प्रकार मिळतात.6 / 8टेम्पल ज्वेलरीमध्ये सध्या मंगळसूत्रही मिळत असून हल्लीच्या नववधूंना ते विशेष आवडत आहेत.7 / 8अशा प्रकारे मोत्यामध्येही टेम्पल ज्वेलरी मिळते...8 / 8असा ठसठशीत सुंदर दागिना गळ्यात असल्यावर नक्कीच कोणाचेही सौंदर्य अधिक खुलून दिसेल यात वाद नाही.