Join us

बेल बॉटमचा रेट्रो ट्रेंड आता झाला नवी फॅशन! अमिताभ - परवीनबाबीचा हॉट लूक करून तर पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2025 19:43 IST

1 / 9
अमेरिकेमधून सुरू झालेली फ्लेअर पॅन्ट किंवा बेल बॉटमची फॅशन हळूहळू सगळीकडेच फेमस झाली होती. भारतातही हा ट्रेंड आला होताच.
2 / 9
महिलाच नाही तर पुरूषही हा ट्रेंड फॉलो करत होते. चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते या अशा पायाशी सुटसुटीत असलेल्या पॅन्ट वापरताना दिसायचे.
3 / 9
मध्यंतरी हा पॅन्टचा ट्रेंड फार चालत नव्हता. सगळे घट्ट कपडे घालताना दिसायचे. मात्र आता पुन्हा हा ट्रेंड चालू झाला आहे. अनेक जण छान सुटसुटीत बॉटम वापरताना दिसतात.
4 / 9
बेल बॉटम दिसायला तर सुंदर दिसतेच मात्र त्यामध्ये वावरणेही सोयीचे असते. त्या पॅन्टचा शरीराला त्रास होत नाही.
5 / 9
या पॅन्टमध्येही अनेक व्हरायटी आहेत. कापड वेगळे असते. डिझाइन वेगळे असते. तसेच फिटींगही वेगवेगळे असते.
6 / 9
कोणी एकाने हा ट्रेंड भारतामध्ये आणला नसला तरी, जीनत अमान या अशा बेल बॉटम पॅन्ट्स वापरताना फार दिसायच्या.
7 / 9
तसेच अमिताभ बच्चन यांनी ही या अशा पॅन्ट अनेक चित्रपटांमध्ये वापरल्या आहेत.
8 / 9
आजकाल बऱ्याच महिला अशा सैल सुटसुटीत पॅन्ट वापरताना दिसतात. तसेच आता काही अभिनेत्रीही या फॅशनचा वापर करताना दिसतात.
9 / 9
त्यामुळे फ्लेअर पॅन्ट बॅक इन अॅक्शन आहे असे म्हणायला हरकत नाही. तुम्ही जर या ट्रेंडला फॉलो केले नसेल तर नक्की करा.
टॅग्स : फॅशनअमिताभ बच्चनझीनत अमानबॉलिवूडक्रिती सनॉन