ईशा अंबानीसह अनेक अभिनेत्रींंना आवडते 'ही' महागडी सॅण्डल, बघा तिची खासियत आणि किंमत By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2024 3:54 PM 1 / 9बॉलीवूड सेलिब्रिटींचे कपडे, त्यांच्या ॲक्सेसरीज, त्यांचे फूटवेअर हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता पुन्हा एकदा अभिनेत्रींची एक खास प्रकारची सॅण्डल चर्चेत आली आहे. 2 / 9अगदी ईशा अंबानीपासून ते बऱ्याच बॉलीवूड अभिनेत्रींच्या पायात ही सॅण्डल दिसली. विशेष म्हणजे अगदी कॅज्यूअली फिरायला जाण्यापासून ते व्हॅकेशनपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे ती वापरता येते. 3 / 9ही सॅण्डल Hermes Oran या ब्रॅण्डची असून ती ५० हजारांपेक्षा जास्त किमतीला मिळते. 4 / 9करिश्मा कपूरकडे ही सॅण्डल लाल आणि काळ्या अशा दोन्ही रंगात उपलब्ध आहे. 5 / 9मागे तिचे काही फोटो व्हायरल झाले होते त्यात तिने Hermes Oran ब्रॅण्डची काळी सॅण्डल घातली होती.6 / 9एका कॅज्यूअल लूक दरम्यान ईशा अंबानीच्या पायातही Hermes Oran सॅण्डल दिसून आली.7 / 9सध्या जिची बरीच चर्चा आहे त्या राधिका मर्चंटकडे म्हणजेच अंबानी परिवाराच्या होणाऱ्या सुनेकडेही या सॅण्डलचा पिवळा जोड दिसून आला.8 / 9कियारा आडवाणीही काही दिवसांपुर्वी या कॅज्यूअल लूकमध्ये दिसून आली. यावेळी तिच्याही पायात Hermes Oran सॅण्डल होती. 9 / 9दिशा पटानी हिच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोंमध्यही तिचे Hermes Oran सॅण्डलबद्दलचे प्रेम दिसून आली. आणखी वाचा Subscribe to Notifications