लग्नात पारंपरिक मराठमोळा लूक हवा, ६ पद्धतीने घ्या शेला! नवरी दिसेल सुंदर-हटणार नाही नजर
Updated:February 23, 2024 19:09 IST2024-02-23T11:42:45+5:302024-02-23T19:09:33+5:30

मराठी लूक केला की खांद्यांवरून घेतलेला शेला हवाच... शेला अंगावर घेतला की आपला आधी साधाच वाटणारा लूक नंतर एकदमच रुबाबदार वाटू लागतो.
सध्या तर कविता लाड यांचा भुवनेश्वरी लूक खूप ट्रेण्डिंग आहे. शेल्याची फॅशन तर आधीही होतीच. पण आता मात्र ती आणखी जास्त जोमात आली आहे. म्हणूनच तुम्हालाही लग्नकार्यात शेला घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने कॅरी करावा, यासाठी हे काही फोटो पाहून घ्या...
असा एका खांद्यावरूनही तुम्ही शेला घेऊ शकता. सध्या अशा पद्धतीच्या वेल्वेटच्या शेल्याची क्रेझ आहे.
वरीलप्रमाणे शेला मोकळा सोडायचा नसेल तर अशा पद्धतीने एका खांद्यावरून तो पिनअप करूनही घेऊ शकता.
टिपिकल मराठी लूक करायचा असेल तर असा दोन्ही खांद्यांवरून शेला घ्या. एकदम ट्रॅडिशनल लूक मिळेल.
खांद्यावरून न घेता असा मागच्या बाजूने घेऊन दोन्ही हातांच्या कोपऱ्यावरून पुढे सोडलेला शेलाही छान दिसतो.
नऊवारी नेसल्यावर किंवा काठपदर साडी घातल्यावरच शेला घ्यावा, असं काही नाही. अशा प्रकारे डिझायनर साडीवरही तुम्ही डिझायनर शेला कॅरी करू शकता.
हा शेल्याचा आणखी एक हटके प्रकार पाहा. सगळ्यांपेक्षा एकदम वेगळा प्रकार हवा असेल तर असा फुलांचा, कळ्यांचा शेला घेऊ शकता.
मॉडर्न साडी लूकवरही तुम्ही अशा स्टायलिश पद्धतीने शेला घेऊ शकता.