आजी-आईच्या साडीचा ड्रेस शिवताय? हे ७ ड्रेस पॅटर्न नक्की शिवून पाहा, दिसा स्टायलिश
Updated:February 18, 2025 19:58 IST2025-02-18T19:49:04+5:302025-02-18T19:58:03+5:30
turn old saree into new beautiful dress, Try these 7 dress patterns and look stylish : साडीची उब आणि ड्रेसचा कम्फर्ट एकाच पोशाखात.

आई-आजीच्या मस्त साड्या कपाटात पडून असतात. आता रोज साड्या नेसणं अनेकींना सोयीचं वाटत नाही. मग ती साडी तशीच न ठेवता तिचा जरा हटके वापर करा.
आजकाल साड्यांचे ड्रेस हा प्रकार महाराष्ट्रात फार प्रसिद्ध आहे. असे ड्रेस दिसतात ही फार सुंदर त्यात काही वाद नाही.
काही वर्षांपूर्वी फक्त जरीच्या साड्यांपासून फंक्शनल ड्रेस शिवले जायचे. पण आता वेगवेगळ्या साड्यांपासून रोजच्या वापराचे कपडेही महिला शिवून घेतात.
साडीचा वापर करून मस्त लांब अनारकली ड्रेस शिवता येतो. असा ड्रेस सुंदर दिसतो.
बारीक काठाच्या साडीपासून शॅर्ट वन पिस शिवता येतो. सध्या हा प्रकार फार चालत आहे.
दोन साड्यांचे कॉम्बीनेशन करून त्यापासून कर्ता आणि लॉंग श्रग शिवता येते. काही तरी वेगळा पण सुंदर असा हा प्रकार आहे.
लहान मुलांसाठी मस्त परकल पोलका शिवता येतो. अशा ड्रेस मध्ये ते फारच गोंडस दिसतात.
मुलींसाठी आईच्या साडीपासून छान फ्रॉक शिकता येतो. त्यामध्ये अस्तर लावल्यावर मुलांना अशा ड्रेसमध्ये त्रासही होत नाही.
साडीपासून तयार केलेला हटके प्रकार म्हणजे जमसूट. ट्रेडीशनल आणि फॅन्सी असे दोन्ही लूक या ड्रेसला आहेत.