नऊवारी नेसून टिपिकल मराठी लूक करायचा? मग 'हे' अस्सल मराठी दागिने तुमच्याकडे आहेत का बघा By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2024 5:46 PM 1 / 11लग्नसराईसाठी टिपिकल मराठी लूक करायचा असेल तर काही पारंपरिक मराठी दागिने तुमच्याकडे असायलाच हवेत. नथ ही जशी मराठीपणाची ओळख आहे, तसेच काही इतर दागिने आहेत जे खूप पुर्वीपासून आपल्याकडे वापरले जातात (typical Marathi Maharashtrian jewellery for wedding season,). त्यापैकी गळ्यात घालण्याचे दागिने किंवा पारंपरिक मराठी नेकलेस कोणते ते पाहुया..(typical Marathi necklace for traditional Marathi look)2 / 11सगळ्यात पहिला दागिना म्हणजे ठुशी. लहान मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत सगळ्यांच्याच गळ्यात ठुशी शोभून दिसते.3 / 11वज्रटीक किंवा कोल्हापूरी साज हा आणखी एक दागिना. हा दागिना गळ्यात सगळ्यात वर घातला जातो आणि तो गळ्याला चिटकून असतो. 4 / 11हा जो सगळ्यात लांब दागिना क्रिती सेननच्या गळ्यात आहे त्याला मोहन माळ म्हणतात. यातल्या मण्यांचा आकार आपल्या आवडीनुसार लहान- मोठा ठेवता येतो. शिवाय मोहनमाळ एक पदरी, दोन पदरी, तीन पदरीही असते.5 / 11याला म्हणतात पोहेहार. काही ठिकाणी हा हार श्रीमंत हार म्हणूनही ओळखला जातो. तो सुद्धा एक पदरापासून ते पाच पदरापर्यंत अस शकतो.6 / 11बकुळीच्या नाजूक फुलांसारखा आकार असणारा हा आहे बकुळी हार. हा अगदी नेकलेसप्रमाणे छोटाही असतो किंवा आपल्या आवडीनुसार आपण तो लांबही घेऊ शकतो. तो ही आपल्या आवडीप्रमाणे आपण एक पदरी, दोन पदरी किंवा तीन पदरी ठेवू शकतो. 7 / 11याला म्हणतात लक्ष्मी हार. हल्ली लक्ष्मीहार नेकलेसप्रमाणे छोटाही मिळतो. काही लक्ष्मीहारांना पेंडंटसुद्धा असते.8 / 11हाराचा हा जो ठसठशीत प्रकार आहे तो पुतळी हार किंवा पुतळा हार म्हणून ओळखला जातो. 9 / 11हा जो सगळ्यात लांब दागिना आहे त्याला एकदाणी म्हणतात. एकदाणीही हल्ली एकपदरी, दोन पदरी, तीन पदरी मिळते. शिवाय सोन्यात करायची असेल तर कमी वजनात तयार होते. 10 / 11चिंचपेटी हा आणखी एक मराठी दागिना. मोत्याची ठसठशीत चिंचपेटी गळ्यात असली की तुमचं रूप आपोआपच खुलतं.11 / 11चिंचपेटीप्रमाणेच तन्मणीसुद्धा एक टिपिकल मराठी दागिना म्हणून ओळखला जातो. आणखी वाचा Subscribe to Notifications