त्याला 'I Love You' म्हणायची हिंमत होत नाही? मग हातावरची मेहेंदी दाखवून हटके स्टाईलने द्या प्रेमाची कबुली By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2024 9:13 AM 1 / 8बऱ्याचदा असंही होतं की तिला तो खूप आवडत असतो. त्यामुळे व्हॅलेंटाईन्स डे ला तिलाच त्याला प्रपोज करायचं असतं. किंवा त्याने तिला प्रपोज केलं तर हिला त्याला हो म्हणायचं असतं.2 / 8पण या दोन्ही गोष्टी करण्यासाठी हिंमतच होत नाही. त्याच्यासमोर गेल्यावर काय बोलावं हेच सुचत नाही. तुमच्याही बाबतीत असंच होत असेल त्याला I Love You म्हणायची हिंमत होत नसेल किंवा मग त्याच्या प्रपोजलला तुम्हाला काही हटके पद्धतीने उत्तर द्यायचं असेल तर फक्त हातावरची मेहेंदी दाखवून द्या..3 / 8तुमच्या भावना त्याच्यापर्यंत आपेआप पोहोचविण्याचं उत्तम माध्यम म्हणजे मेहेंदी. म्हणूनच तर यावर्षी व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल मेहेंदी डिझाईन्स व्हायरल होत आहेत. बघा त्यातलं तुम्हाला नेमकं कोणतं डिझाईन आवडतं... 4 / 8एरवी सणासुदीला, लग्नकार्यात काढतो तशा भरगच्च डिझाईन्स मुळीच काढू नका.. असं काहीसं छानसं पण खूप बोलकं काढून तुमच्या प्रेमाची कबूली द्या...5 / 8असं त्याच्या नावाचं इनिशियल काढूनही तुम्ही प्रेमाची कबूली देऊ शकता.6 / 8अशा पद्धतीची डिझाईन दोन्ही हातांवर काढा आणि त्याला ती दाखवून त्याच्या प्रपोजलला हो म्हणा... हो म्हणण्याची तुमची ही स्टाईल त्याला नक्कीच आवडून जाईल. 7 / 8हे बघा हे आणखी एक व्हॅलेंटाईन्स स्पेशल मेहेंदी डिझाईन... युनिक आणि अतिशय स्टायलिश.8 / 8 आणखी वाचा Subscribe to Notifications