Vat Purnima 2022 : वटपौर्णिमेला ट्राय करा पारंपरिक तितकाच मॉर्डन मराठमोळा लूक; लेटेस्ट आयडिया पाहा एका क्लिकवर Published:June 7, 2022 03:48 PM 2022-06-07T15:48:06+5:30 2022-06-08T12:30:51+5:30
Vat Purnima 2022 : साडी तर सगळ्यात बायका नेसतात पण त्यातल्या त्यात काय वेगळं करता येईल. वटपौर्णिमेला मराठमोळा पारंपारीक पण तितकाच मॉडर्न लूक कसा करता येईल. यासंदर्भातील आयडिया या लेखात देणार आहोत. वट पौर्णिमेचा (Vat Purnima 2022) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला. या दिवशी कोणती साडी नेसायची, सर्वांपेक्षा वेगळा लूक कसा करता येईल. असे विचार प्रत्येक विवाहीत महिलेच्या डोक्यात सुरू असतात. यादिवशी छान नटता छटता येतं मस्त फोटो काढून सोशल मीडियावर अपलोडसुद्धा केले जातात. (How to get dressed on vat purnima)
साडी तर सगळ्यात बायका नेसतात पण त्यातल्या त्यात काय वेगळं करता येईल. वटपौर्णिमेला मराठमोळा पारंपारीक पण तितकाच मॉडर्न लूक कसा करता येईल. यासंदर्भातील आयडियाज या लेखात देणार आहोत. (Saree dressing idea for vat savitri 2022 Marathmola look idea for vat purnima)
वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पारंपारीक नऊवारी साडी नेसू शकता. आजकाल नववारीमध्ये पेशवाई, मस्तानी असे एकापेक्षा एक पॅटर्न्स उपलब्ध आहेत. तुम्हाला हव्या त्या रंगाची नऊवारी साडी तुम्ही वटपौर्णिमेला नेसून पारंपारीक लूक मिळवू शकता. नववारीवर मोत्याचे दागिने किंवा गोल्ड प्लेटेट ज्वेलरी वेअर करू शकता. कपाळावर चंद्रकोर आणि नथ घातल्यास तुमचा लूक अजूनच खुलून दिसेल.
नववारी साडीवर तुम्ही काळ्या मणांचं मणी मंगळसुत्र आणि त्यावर गोल्डन मोठं मंगळसुत्र घालू शकता. साडीवर मॅचिंग रंगाच्या बांगड्या घालणयापेक्षा हिरव्या बांगड्या आणि त्यांच्या आजूबाजूला कडे खूप चांगले दिसतील.
आज काल बाजारात तुम्हाला हव्या त्या आकाराच्या आणि नावांच्या नखी उपलब्ध आहेत. पतीच्या नावाची किंवा हव्याच्या शेपची नथ तुम्ही ऑनलाईन मागवू शकता किंवा बाजारातूनही घेऊ शकता.
तुम्ही बाजूबंद कधी घालते नसतील तर या वटपौर्णिमेला पारंपारीक लूकसाठी बाजूबंद, कमरपट्टा आणि कानात साजेसे झुमके घालू शकता.
केस मोकळे सोडण्यापेक्षा पुढच्या केसांची हेअरस्टाईल किंवा पफ काढून मागच्या केसांचा बन बांदा तुम्हाला जास्त वेळ नसेल तर तुम्ही रेडीमेट बनसुद्धा केसांना लावू शकता. या बनभोवती आर्टिफिशिल फुलं, वेण्या, ब्रॉच किंवा गजरा लावून केसांचे सौंदर्य खुलवू शकता.
जर केसांचा बन बांधत असाल तर तो जास्त वर बांधू नका यामुळे तुमचा लूक बिघडू शकतो. मध्ये किंवा खाली बन बांधून त्याभोवती गजरा गुंडाळा.
यावेळी तुम्हाला काही वेगळं ट्राय करायचं असेल तर काठापदराच्या कॉमन साड्या न नेसता खणाची साडी नेसा. खणांच्या साडीवर ऑक्साईड (सिल्वर) ज्वेलरी अगदी खुलून दिसेल.
खणांच्या साडीव्यतिरिक्त हिरकणी साडीसुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी बेस्ट लूक देईल.
तुम्हाला काठाच्या किंवा सिल्कसाठी सिंपल लूक हवा असेल तर तुम्ही स्लिव्हजलेस ब्लाऊज ट्राय करू शकता.
श्रृंगाराच्या संकल्पनेत दागिन्यांचं महत्त्व फार आहे. दागिन्यांमध्ये कानातले झुमके, बुगडी, गळ्यातील नेकलेस, पायातले पैंजण आणि कपाळावरची चंद्रकोर किंवा टिकली ही तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर टाकेल. तुम्हाला वाटल्यास बिंदीसुद्धा लावू शकता.
आजकाला बाजरात कमरपट्ट्यांचे खूप प्रकार पाहायला मिळतात. दागिन्यांच्या दुकानातून तुम्ही साडीवर सुट होईल अशा टाईपचा कमरपट्टा आणू शकता.
पाऊस असेल तर शक्यतो वॉटरप्रूफ मेकअपला पसंती द्या. बेसिक मेकअपसोबत तुमची साडी किंवा कुर्ता हा गोल्डन थीमचा असेल तर तुम्ही गोल्डन आयशॅडो लावू शकता. जर तुम्हाला हेवी मेकअप नको असेल फक्त पावडर, लायनर आणि लिपस्टीक लावूनही तुम्ही छान दिसाल.
तुम्हाला वेळ असेल तर आदल्या दिवशी हातांवर छान मेहेंदी काढू शकता किंवा पार्लरमधून काढून घ्या. कमी खर्चात तुम्हाला तुमची हौस पूर्ण करता येईल.
(All Image Credit- Social Media)