वटपौर्णिमा स्पेशल : पूजेला नेसा नऊवारी साडी, पाहा देखणा पारंपरिक लूक करण्याचे सुंदर पर्याय...

Published:June 19, 2024 06:54 PM2024-06-19T18:54:57+5:302024-06-19T19:24:55+5:30

Vatpurnima Special Nauvari Sadi Look : वटपौर्णिमेच्या दिवशी नवनवीन पद्धतीने नऊवारी साडी नेसायची आहे, पाहा हे खास लूक...

वटपौर्णिमा स्पेशल : पूजेला नेसा नऊवारी साडी, पाहा देखणा पारंपरिक लूक करण्याचे सुंदर पर्याय...

महाराष्ट्रात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. वटपौर्णिमेचा सण हा महिलांसाठी अत्यंत खास असतो. या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. शक्यतो या दिवशी सर्वच महिला साडी नेसण्याला प्राधान्य देतात. सर्व महिला साड्या, दागिने घालून साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी तयार होतात. यंदाच्या वटपौर्णिमेला जर आपण नऊवारी साडी नेसणार असाल तर, कोणकोणत्या प्रकारे नऊवारीसाडी नेसू शकतो ते पाहूयात(Vatpurnima Special Nauvari Sadi Look).

वटपौर्णिमा स्पेशल : पूजेला नेसा नऊवारी साडी, पाहा देखणा पारंपरिक लूक करण्याचे सुंदर पर्याय...

पूर्वीपासून ब्राह्मण पद्धतीच्या नऊवारी साड्या या विवाह सोहळ्याच्यावेळी किंवा सणा – समारंभाला नेसल्या जायच्या. या नऊवारी साडीच्या काठाकडचा भाग वर उचलून कमरेला खोचला जातो. ज्याला 'ओचा' असं म्हटलं जातं. या वटपौर्णिमेला आपण अशा प्रकारची ब्राह्मणी नऊवारी साडी नेसू शकता. ब्राह्मणी नऊवारी साडीवर आपण तन्मणी हा पारंपरिक दागिना घालून आपला लूक अधिक आकर्षक करु शकतो.

वटपौर्णिमा स्पेशल : पूजेला नेसा नऊवारी साडी, पाहा देखणा पारंपरिक लूक करण्याचे सुंदर पर्याय...

हल्ली नऊवारीमध्ये सिल्क साड्यांनाही विशेष मागणी असते. यामध्ये पैठणी सिल्क जास्त प्रमाणात वापरली जाते. अतिशय चापून चोपून अशी शरीराला घट्ट बसेल अशा तऱ्हेने ही साडी नेसण्यात येते. या साडीवर ३ ते ४ पदरी मोहनमाळ घालण्यास साडीचा लूक अतिशय खुलून दिसेल.

वटपौर्णिमा स्पेशल : पूजेला नेसा नऊवारी साडी, पाहा देखणा पारंपरिक लूक करण्याचे सुंदर पर्याय...

बऱ्याचजणींना सुळसुळीत साड्या आवडत नाहीत. अगदी अंगाला व्यवस्थित चिकटून राहणाऱ्या नऊवारी आणि कॉटन ब्लेंडच्या साड्या त्यासाठी जास्त चांगल्या असतात. या साड्या अंगाला जास्त घाम आला तरी टिपून घेतात.

वटपौर्णिमा स्पेशल : पूजेला नेसा नऊवारी साडी, पाहा देखणा पारंपरिक लूक करण्याचे सुंदर पर्याय...

कोल्हापुरी नऊवारी साडी मध्ये दोन काष्टा असतात. आपण यंदाच्या वटपौर्णिमेला अशी दोन काष्टा असणारी साडी देखील नेसू शकता. यावर कोल्हापुरी साज घालून आपण वटपौर्णिमेचा लूक पूर्ण करु शकतो.

वटपौर्णिमा स्पेशल : पूजेला नेसा नऊवारी साडी, पाहा देखणा पारंपरिक लूक करण्याचे सुंदर पर्याय...

ही नऊवारी साडी नेसण्याची पद्धत साधारण ब्राह्मणी पद्धतीप्रमाणेच आहे. पण ब्राह्मणी पद्धतीच्या तुलनेमध्ये पेशवाई नऊवारीच्या ओचा हा कमी असतो. इतका मोठा ओचा या पद्धतीत काढला जात नाही. अगदी ४ ते ५ इंचाचा ओचा काढला जातो. नाकात नथ, गळ्यात ठुशी, तन्मणी घालून केसांचा बन घालून त्यावर गजरा माळू शकता.

वटपौर्णिमा स्पेशल : पूजेला नेसा नऊवारी साडी, पाहा देखणा पारंपरिक लूक करण्याचे सुंदर पर्याय...

सण - समारंभ असला की वेगवेगळ्या पद्धतीच्या नऊवारी साड्या वापरल्या जातात. काहीजणींना मोठ्या बॉर्डरची नऊवारी नेसायला जास्त आवडते. या बॉर्डरमुळे त्या नऊवारी साडीचा साज अधिक चांगला उठून दिसतो. गळ्यात चिंचपेटी, ठुशी हातात बांगड्या, तोडे असे दागिने घालू शकता.

वटपौर्णिमा स्पेशल : पूजेला नेसा नऊवारी साडी, पाहा देखणा पारंपरिक लूक करण्याचे सुंदर पर्याय...

पैठणीला सगळ्या साड्यांची महाराणी असे म्हटले जाते. पैठणी साडीचा स्वतःचा असा एक विशेष लूक असतो. पैठणी साडी आपण पेशवाई किंवा ब्राह्मणी पद्धतीने नेसू शकतो. त्यावर आपण उपरणे देखील खांद्यावर घेऊ शकतो. पैठणी सोबत आपण वज्रटीक, तन्मणी, ठुशी असे काही पारंपरिक दागिने घालू शकतो.

टॅग्स :फॅशनfashion