स्टायलिश दिसायचं आहे? वाणी कपूरचा हा लूक पाहा, स्पेशल दिवसासाठी खास पर्याय By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2023 2:09 PM 1 / 8बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर आपल्या बोल्ड आणि हटके अदांसाठी ओळखली जाते. तिचा प्रत्येक लूक हा घायाळ करणारा ठरतो. लवकरच व्हॅलेन्टाईन विक सुरू होईल. या दिवसात प्रेमी युगुल आपल्या प्रेमासाठी स्पेशल गोष्टी करतात. त्यांना खुश करण्यासाठी गिफ्ट्स, चॉकलेट्स, ड्रेस अशा विविध भेट वस्तू देऊन आपल्या प्रेमाला खुश करतात. 2 / 8दरम्यान, या दिवसात स्पेशल दिसण्यासाठी काय परिधान करावे हे सुचत नाही. आपण व्हॅलेन्टाईन डे ला खास वाणी कपूरचा हा लूक कॅरी करू शकता. तिने हा लूक आपल्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे. 3 / 8वाणी सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. ती आपले रिसेंट लूक आणि प्रोजेक्ट्स आपल्या चाहत्यांसह शेअर करते. आपल्याला जर व्हॅलेन्टाईन डे ला स्पेशल दिसायचं असेल तर, हा शिमरी लूक आपण फॉलो करू शकता. 4 / 8अभिनेत्रीने अतिशय सुंदर रस्ट कलरचा गाऊन परिधान केला आहे. हा चमकदार ड्रेस वाणीला खूप सूट करत आहे. याच तिचा सिझलिंग अवतार दिसत आहे. थाई हाय सिल्ट ड्रेसमध्ये वाणी हॉट अँड ब्युटीफूल दिसत आहे. सध्या या ड्रेसचा पॅटर्न ट्रेण्डींगमध्ये आहे. त्यामुळे आपण या लूकमध्ये नक्कीच स्पेशल दिसाल.5 / 8अलीकडेच एका अवॉर्ड फंक्शनमध्ये वाणीने हा शिमरी चमकदार ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये प्लजिंग नेकलाइन आहे. यासह ओपन बॅक आहे. हाफ स्लीव्ह असल्यामुळे वाणी खुप सुदंर दिसत आहे.6 / 8या ड्रेसवर वाणीने कमीत कमी ज्वेलरी परीधान केली आहे. फक्त लांब चेन नेकलेस या ड्रेसवर सुट करत आहे. त्यात हिरव्या रंगाचे स्टोन लॉकेट आहे. जे लक्षवेधी ठरत आहे.7 / 8वाणीने या ड्रेसवर केसांची हेअरस्टाईल साधी ठेवली आहे. तिने केसांचा अंबाडा बांधला आहे. गुलाबी लिप शेड लिपस्टिकवर हलका मेकअप लूक ठेवला आहे. या ड्रेसवर वाणीने अतिशय सुंदर पोज देतानाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे. सध्या हे फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले आहेत.8 / 8शिमरी ड्रेस सध्या अनेक अभिनेत्री पार्टीमध्ये परिधान करतात. चमकदार ड्रेस असो या साडी शिमरी पॅटर्नमध्ये प्रत्येक महिला सुंदर दिसते. आणखी वाचा Subscribe to Notifications