Join us

लग्नात नवरीसह तिच्या मैत्रीणींचाही लूक बदलणारे पाहा सुंदर ‘मांग टिका!’ डोक्यावर सजेल सुंदर बिंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2025 19:05 IST

1 / 9
सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे त्या निमित्ताने वेगवेगळ्या दागिन्यांची खरेदी अगदी जोरात सुरू आहे. लग्नाच्या दिवशी नवरी हमखास सुंदर बिंदी किंवा मांग टिका लावतेच..(wedding special beautiful bindi or maang tika designs)
2 / 9
हल्ली तर फक्त नवरीच नाही तर तिच्या आणि नवरदेवाच्या करवल्याही खूप छान नटतात. अगदी हौशीने सगळ्या कपड्यांची आणि दागिन्यांची खरेदी करतात. अशावेळी त्यांचा लूक कम्प्लिट होण्यासाठी त्यांना बिंदी लागतेच..(beautiful maang tika designs for bride)
3 / 9
बिंदीचे असे अनेक वेगवेगळे प्रकार सध्या बाजारात आलेले आहेत. किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही ते मागवू शकता.
4 / 9
बिंदी निवडताना ती अशीच घ्या की ती तुमच्या कानातल्यांना आणि गळ्यातल्याला छान मॅच होईल.
5 / 9
शिवाय ड्रेस किंवा साडी आणि बिंदी यांची रंगसंगतीही परफेक्ट जुळून यायला हवी. तरच ती बिंदी तुमच्या संपूर्ण लूकला शोभून दिसते.
6 / 9
खूप मोठ्या आकाराची बिंदी आवडत नसेल तर अशा पद्धतीची छोट्या आकाराची बिंदीही तुम्हाला बाजारात किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळू शकते.
7 / 9
हल्ली अशा पद्धतीची मोत्याची बिंदीही खूप ट्रेण्डिंग आहे. त्यामुळे इतर सगळे दागिने मोत्याचे घालणार असाल तर तुमची बिंदीसुद्धा मोत्याचीच हवी.
8 / 9
जर तुमचं बजेट थोडं जास्त असेल तर अशा पद्धतीची अगदी नाजुक डिझाईन असणारी सोन्याची बिंदीही तुम्ही घेऊ शकता.
9 / 9
टॅग्स : फॅशनदागिनेलग्नखरेदीऑनलाइनस्टायलिंग टिप्स