1 / 9एरवी आपण स्लिव्हलेस, अखूड बाह्यांचे, कोपऱ्यापर्यंत बाह्या असणारे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज घालतो. पण सहसा लांब बाह्यांचं ब्लाऊज घातलं जात नाही. म्हणूनच हिवाळ्याच्या निमित्ताने लांब बाह्यांचं एखादं तरी स्टायलिश ब्लाऊज तुमच्या वॉडरोबमध्ये असू द्या. कारण त्यामुळे तुम्ही अधिक आकर्षक तर दिसताच, पण बोचऱ्या थंडीपासून तुमचं संरक्षणही होतं. 2 / 9सध्या पफ ब्लाऊजची फॅशन आहेच. त्यामुळे अशा पद्धतीचा पफ असणारं ब्लाऊज लांब बाही या प्रकारातही छान दिसतं. 3 / 9कोणतीही प्लेन साडी असेल तर तिच्यावर अशा पद्धतीचं वर्क असणारं लांब बाह्यांचं ब्लाऊज खूप सुंदर लूक देणारं ठरेल.4 / 9लांब बाह्यांमध्ये अशा पद्धतीचं जॅकेट ब्लाऊजही हल्ली खूप ट्रेडिंग आहे. हे ब्लाऊज तुम्ही लेहेंगा किंवा साडी दोन्हीवरही घालू शकता.5 / 9सोनम कपूरने घातलेलं हे ब्लाऊजही जॅकेट ब्लाऊज प्रकारातलंच आहे. या प्रकारच्या ब्लाऊजचा एक फायदा म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही जॅकेट काढू शकता किंवा पुन्हा घालूही शकता.6 / 9थोडं हटके प्रकारातलं लांब बाह्यांचं ब्लाऊज शिवायचं असेल तर अशा पद्धतीने बाह्यांवर आणि गळ्याच्याभोवती छान एम्ब्रॉयडरी किंवा वर्क करून घ्या. जेणेकरून मग तुम्हाला इतर कोणत्याही हेवी दागिन्यांची गरज नाही. 7 / 9हिवाळ्याच्या दिवसात असं एखादं प्रिंटेड काळं ब्लाऊज शिवून घ्या. बऱ्याच कॉटनच्या साड्यांवर ते अगदी छान मॅच होऊन जातं.8 / 9हिवाळ्याच्या दिवसात लांब बाह्यांचा वेलवेट ब्लाऊज घालण्यास प्राधान्य द्या. वेलवेटचा कपडा उबदार असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी लॉनवर किंवा मोकळ्या मैदानात जर काही कार्यक्रम असेल तर थंडी वाजून येऊ नये, म्हणून हा एक परफेक्ट चॉईस ठरू शकतो. 9 / 9आता लग्न सराईचे दिवस आहेत. त्यामुळे लेहेंगा, घागरा, चनिया चाेली असं काही घेणार असाल तर त्यावर अशा पद्धतीचं बंद गळ्याचं आणि लांब बाह्यांचं ब्लाऊज शिवू शकता.