Join us

यामी गौतमच्या ब्लाऊजचं खास कलेक्शन, तिच्यासारखं स्टायलिश सोबर आणि डिसेंट दिसायचंय? पाहा पॅटर्न..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2025 18:40 IST

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम केवळ वेस्टनच नाही तर भारतीय कपड्यात देखील अधिक सुंदर दिसते. (wedding blouse designs)
2 / 8
जी साध्या लूकमध्येही अत्यंत सुंदर दिसते. जर वयाची पस्तीशी ओलांडली असाल आणि तुम्हाला ब्लाऊजचं खास कलेक्शन सापडत नसेल तर हे पॅटर्न पाहा. (blouse ideas for women over 35)
3 / 8
ऑफिस पार्टी, लग्न समारंभ किंवा एखाद्या खास प्रसंगात तुम्हाला स्टायलिश सोबर आणि डिसेंट दिसायचंय असेल तर तुमच्या कपाटात हे ब्लाऊज असायलाच हवे. (Stylish blouse pattern)
4 / 8
अर्धा बाह्यांच्या फूल भरलेला काळ्या रंगाचा ब्लाऊज आपल्या कोणत्याही प्लेन किंवा नेटच्या साडीवर शोभून दिसेल.
5 / 8
जर तुम्हाला अधिक स्टायलिश दिसायचं असेल तर हॉल्टर नेकचा पर्याय चांगला आहे. यामध्ये गळ्यात काही न घालता, कानात मोठ्या रिंगा घालू शकता.
6 / 8
तुमच्याकडे चौकर किंवा मोठा नेकलेस असेल तर तुम्ही फूल बाह्यांचा ब्लाऊज शिवू शकता. मनगटाच्या जवळ तुम्ही ब्लाऊजला शोभेल अशी लेसही लावू शकता.
7 / 8
आपल्याला पारंपारिक लूक करायचा असेल तर काठपदराची साडी नेसा, त्याच्या ब्लाऊजमध्ये हमखास तुम्हाला बॉर्डर मिळेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा अर्धा बाह्यांचा ब्लाऊज परिधान करु शकता.
8 / 8
ऑफिस पार्टीमध्ये सगळ्यांमध्ये उठून दिसायचं असेल तर नॉटवाला ब्लाउज घालू शकता. यामध्ये तुमची साडी फ्लोरल प्रिटेंड असेल तर अधिकच आकर्षित दिसालं
टॅग्स : फॅशन