Join us   

वजन कमीच होत नाही? रोज फक्त १० मिनिटांचा व्यायाम- आठवडाभरात झरझर वजन उतरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 2:03 PM

1 / 7
काही केल्या वजनच कमी होत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. तुमचंही असंच काहीसं असेल तर या काही टिप्स बघा... (10 minutes workout for weight loss)
2 / 7
व्यायाम करायला वेळच मिळत नाही, असं अनेकांचं म्हणणं असतं. आणि ते बऱ्याच अंशी बरोबर आहे. म्हणूनच अगदी मोजके १० ते १५ मिनिटे व्यायाम करून वजन कसं कमी करायचं (easy and effective method of weight loss), याविषयीची माहिती timesofindia ने शेअर केली आहे. (how to loose 1-2 kg weight in a week?)
3 / 7
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की जम्पिंग जॅक, बर्पीज यासारखे व्यायाम नियमितपणे करा. हे व्यायाम करताना होणाऱ्या विशिष्ट हालचालींमुळे अंगावरची चरबी वेगाने कमी होण्यास मदत होते.
4 / 7
प्लँक्स, क्रंचेस, सायकलिंग असे कार्डिओ एक्सरसाईज दिवसांतून १० मिनिटे नियमितपणे करा..
5 / 7
स्विमिंग, रनिंग, जॉगिंग हे देखील उत्तम व्यायाम आहेत. ते तुम्ही नियमितपणे केले तरी वजन एका विशिष्ट प्रमाणात नक्कीच कमी होऊ शकते.
6 / 7
भरपूर पाणी प्या. नारळपाणी, ग्रीन टी, ताक असंही तुम्ही घेऊ शकता. हे द्रव पदार्थ पिऊन शरीर व्यवस्थित हायड्रेटेड राहते. त्याचा परिणाम म्हणजे चयापचय आणि पचनक्रिया चांगली होते आणि शरीरावर अतिरिक्त चरबी साठून राहण्याचं प्रमाण बरच कमी होतं.
7 / 7
याशिवाय बाहेरचं खाणं कटाक्षाने टाळा. जंकफूड, प्रोसेस्ड फूड, प्रोसेस्ड ड्रिंक्स किंवा ज्यूस घेणं बंद करा. यामुळे शरीरात खूप जास्त प्रमाणात साखर, मैदा जातो आणि त्याचा परिणाम वजन वाढीमध्ये दिसून येतो.
टॅग्स : फिटनेस टिप्सव्यायामवेट लॉस टिप्स