Join us   

पोटावर साचलेली चरबी महिनाभरात कमी होईल, फक्त ४ व्यायाम करा! सुटलेलं पोट गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 12:42 PM

1 / 6
सुटलेलं पोट हा अनेक जणांपुढचा विषय आहे. वयाचा एक ठराविक टप्पा ओलांडला की अनेकांचं पोट सुटतं. याचं कारण म्हणजे बैठं काम, चयापचय क्रियेत होणारा बदल, आहारावर नियंत्रण नसणे, व्यायामाचा अभाव.. महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर बाळंतपणानंतर अनेकींच्या ओटीपोटावरची चरबी खूप वाढते. (4 exercise to reduce belly fat)
2 / 6
पोटावर लटकणारी चरबी कमी करता करता अनेकींच्या नाकीनऊ येतात. पण जर तुम्ही योग्य पद्धतीने, योग्य व्यायाम, योग्य प्रमाणात केले तर मात्र पोटावरची चरबी बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते, असं फिटनेस ट्रेनर नादिया मरडॉक्स सांगतात (4 Best Bodyweight Exercises To Lose Your Belly). ते व्यायाम नेमके कोणते याविषयी त्यांनी दिलेली माहिती eatthis.com या साईटवर शेअर करण्यात आली आहे. (how to reduce belly fat?)
3 / 6
त्यापैकी पहिला व्यायाम आहे सुमो स्क्वॅट्स. हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर घेऊन उभे राहा. दोन्ही हात एकमेकांत गुंफुन छाती जवळ घ्या. त्यानंतर गुडघे वाकवून शरीर खाली करा. यामध्ये पाठीचा कणा ताठ ठेवा. एका सेटमध्ये दहा ते बारा वेळा हा व्यायाम करा. असे साधारण पाच सेट करा.
4 / 6
दुसरा व्यायाम आहे Lunge Tap Out. हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही पायात अंतर घ्या. उदा. उजवा तळपाय उजव्या दिशेला करून शरीर उजव्या बाजूने करा. दोन्ही हात छातीजवळ एकमेकात बांधून ठेवा. यानंतर शरीर पुढे झुकवून डावा पाय उचलून मागे करा. शरीर एका रेषेत पूर्णपणे आडवे झाले पाहिजे, अशा पद्धतीने हालचाल करा. त्यानंतर पुन्हा पहिल्या पोझिशनला या. असे ८ ते १० वेळेस करा. असे साधारण ५ सेट करा.
5 / 6
तिसरा व्यायाम आहे पुशअप्स. ८ ते १२ वेळेस पुशअप्स करा. असे साधारण ५ सेट करा.
6 / 6
नियमितपणे प्लँक आणि त्याच्यातले वेगवेगळे व्यायाम केल्यानेही ओटीपोटावरची चरबी कमी होते. सुरुवातीला प्लँकची पोझिशन साधारण ३० सेकंदासाठी टिकवून ठेवा. त्यानंतर हळूहळू तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे वेळ वाढवत न्या...
टॅग्स : फिटनेस टिप्सव्यायाम