5 exercise for reducing belly fat, how to reduce belly fat? weight lose tips
सुटलेलं पोट पटकन कमी करण्यासाठी ५ व्यायाम, वजनही होईल कमी आणि पोटावरची चरबी गायबPublished:April 29, 2024 02:40 PM2024-04-29T14:40:35+5:302024-04-29T15:03:51+5:30Join usJoin usNext पोटावर लटकणारी चरबी कमी कशी करायची, हा अनेकांपुढचा प्रश्न असतो. बाकी शरीर सुडौल असतं. पण पोटावरची चरबी मात्र वाढलेली असते. ही चरबी कमी करण्यासाठी हे काही साधे- सोपे व्यायाम पाहा. यामुळे पोटावरचे टायर्स कमी करण्यासाठी नक्कीच मदत होईल. यापैकी सगळ्यात पहिला व्यायाम आहे सायकलिंग. नियमितपणे सायकलिंग केल्याने पोट तर कमी होतेच, पण मांड्या, पोटऱ्या, हिप्स या भागातली चरबीही कमी होते. चक्रासन केल्याने पोटाच्या स्नायूंवर ताण पडतो आणि तिथली चरबी कमी होते. चक्रासन नियमितपणे केल्यामुळे मासिक पाळीतले त्रासही बऱ्याच प्रमाणात कमी होतात. दररोज ५ ते १० सुर्यनमस्कार नियमितपणे घातल्यास पोटावरची चरबी तर कमी होईलच, पण शरीर बांधेसूद, सुडौल होण्यास मदत होईल. नौकासन या प्रकारात पोटाच्या स्नायूंवर चांगला दबाव पडतो. यामुळे पचनक्रिया, चयापचय क्रिया उत्तम होऊन पोट कमी होण्यास, वजन उतरण्यास फायदा होतो. प्लँक करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळेही पोटावरची चरबी झटकन कमी होते. शिवाय दंड, मांड्या यावरची चरबीही कमी होते. टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदेFitness TipsWeight Loss TipsExerciseYoga