आजचं काम उद्यावर ढकलण्याची सवय आहे? झपाझप काम करायचंय? करा फक्त ५ गोष्टी, आनंदाची चावी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2024 9:07 AM 1 / 7आपल्याला करायचं खूप असतं, पण उद्या करु म्हणून आपण कामं लांबणीवर टाकतो. शिस्त कमी पडते. जपानी लोकांचं तसं होत नाही. म्हणून त्यांच्याकडून शिकूया या ५ गोष्टी.जपानी लोकांचा उत्साह आणि त्यांचं एखादं काम झपाट्याने उरकण्याचं तंत्र खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. शिवाय त्या लोकांचा फिटनेस हा तर जगासाठी कायमच एक उत्सूकतेचा विषय असतो. लठ्ठ प्रकारात मोडणारी जपानी माणसं क्वचितच आपल्याला दिसतील.2 / 7जपानी लोक एवढे उत्साही, आनंदी का असतात तसेच ते न थकता कित्येक तास न दमता अथकपणे कसे काय काम करू शकतात, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्यांचे हे ५ गुण पाहा. त्यांच्या या सवयी आपण स्वत:ला लावून घेतल्या तर नक्कीच आपणही त्यांच्यासारखेच उत्साही आणि फिट होऊ...3 / 7त्यांची सगळ्यात पहिली सवय म्हणजे व्यायाम करणे. ते लोक चालण्याचा अजिबात कंटाळा करत नाहीत. इतर दुसरा कोणता व्यायाम नाही करू शकलो तरी आपण त्यांच्यासारखा चालण्याचा व्यायाम तर नक्कीच करू शकतो.4 / 7बहुतांश जपानी लोकांना ग्रीन टी पिण्याची सवय असते.5 / 7ते लोक त्यांच्याकडचे पारंपरिक पदार्थ खाण्यावर अधिक भर देतात. तेथील लहान मुलांनाही जंकफूडपेक्षा त्यांच्याकडचे पारंपरिक पदार्थच अधिक आवडतात, असं मागेच एका अभ्यासातून समोर आलं आहे.6 / 7Minimalism हे बहुतांश जपानी लोकांचं वैशिष्ट्य आहे. मिनिमलीझम म्हणजे आपल्या गरजेपुरत्याच वस्तू घेणे आणि तेवढ्याच वापरणे, सांभाळणे. त्यामुळे या लोकांचा जास्त वेळ किंवा एनर्जी इतर गोष्टींवर अजिबात खर्च होत नाही. आपण आपल्या घराच्या, सामानाच्या बाबतीत हे केलं तर आपलाही खूप वेळ वाचू शकतो.7 / 7फॉरेस्ट बाथिंग ही संकल्पना त्यांच्याकडे पाहायला मिळते. मिळेल तसा वेळ काढून जमेल तितके दिवस ते लोक निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन राहतात आणि स्वत:ला रिफ्रेश करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications