काही केल्या वजन कमी होईना? सकाळी उपाशीपोटी ५ पदार्थ खा- भराभर वजन उतरेल, करून बघा

Updated:December 12, 2024 15:25 IST2024-12-12T15:21:07+5:302024-12-12T15:25:51+5:30

काही केल्या वजन कमी होईना? सकाळी उपाशीपोटी ५ पदार्थ खा- भराभर वजन उतरेल, करून बघा

वाढतं वजन कसं कमी करावं किंवा ते कसं नियंत्रित ठेवावं, हा प्रश्न सध्या बहुतांश लोकांना छळतो आहे. तुम्हीही याच चिंतेत असाल तर आहारतज्ज्ञांनी सांगितलेला हा एक खास उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहा.(5 Things to Have on an Empty Stomach for fast Weight Loss!)

काही केल्या वजन कमी होईना? सकाळी उपाशीपोटी ५ पदार्थ खा- भराभर वजन उतरेल, करून बघा

काही पदार्थ जर आपण रोज सकाळी उपाशीपोटी नियमितपणे खाल्ले तर त्यामुळे चयापचय, पचनक्रिया चांगली होते. त्याचा परिणाम म्हणजे शरीरावर अतिरिक्त चरबी साचून राहण्याचे प्रमाण बरेच कमी होते. ते पदार्थ नेमके कोणते याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ आहारतज्ज्ञांनी growithneha या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

काही केल्या वजन कमी होईना? सकाळी उपाशीपोटी ५ पदार्थ खा- भराभर वजन उतरेल, करून बघा

त्यातला पहिला पदार्थ आहे रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम आणि अक्रोड. या दोन्हींमधून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. त्यामुळे सकाळी सकाळी भूक लागल्यासारखं वाटून आपण बऱ्याचदा ज्या अनावश्यक गोष्टी खातो, त्या खाण्याची इच्छा होत नाही.

काही केल्या वजन कमी होईना? सकाळी उपाशीपोटी ५ पदार्थ खा- भराभर वजन उतरेल, करून बघा

दुसरा पदार्थ म्हणजे आवळ्याचं सरबत. तुम्ही नुसता आवळाही खाऊ शकता. त्यातून व्हिटॅमिन सी मिळतं. तसेच चयापचय क्रिया चांगली होऊन वजन लवकर कमी होण्यास मदत होते.

काही केल्या वजन कमी होईना? सकाळी उपाशीपोटी ५ पदार्थ खा- भराभर वजन उतरेल, करून बघा

तिसरा पदार्थ आहे ब्राझील नट. यामुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना हार्मोन्सचे संतुलन बिघडल्याने वजन वाढीचा त्रास होतो, त्यांचा हा त्रास ब्राझील नट नियमितपणे खाल्ल्यास नक्कीच कमी होऊ शकतो.

काही केल्या वजन कमी होईना? सकाळी उपाशीपोटी ५ पदार्थ खा- भराभर वजन उतरेल, करून बघा

हळद आणि मिरेपूड टाकून केलेला काढा प्यायल्यानेही वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

काही केल्या वजन कमी होईना? सकाळी उपाशीपोटी ५ पदार्थ खा- भराभर वजन उतरेल, करून बघा

चिया सीड्सचं पाणी दरराेज सकाळी नियमितपणे प्या. यामुळे शरीराला जे फायबर मिळतात त्यामुळे पचन क्रिया चांगली होऊन वजन वाढीची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते.