5 tips to get sound sleep, how to get sound sleep at night, 5 tips for better sleep
रात्री लवकर झोप येत नाही, लगेच झोपमोड होते? ५ गोष्टी करा, अंथरुणावर पडताच शांत झोपालPublished:December 12, 2024 11:55 AM2024-12-12T11:55:53+5:302024-12-12T12:01:27+5:30Join usJoin usNext असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं की त्यांना रात्री लवकर झोप येत नाही. खोलीत अंधार करून अंथरुणावर पडून राहिलं तरी डोळा लागत नाही. झोप लागलीच तरी लगेच जाग येते आणि झोपमोड होते. तुमच्याही बाबतीत असंच सगळं होत असेल तर या काही गोष्टी करून पाहा. यामुळे तुम्हाला अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येईल. साधारणपणे सायंकाळी ४- ५ वाजेनंतर काॅफी, चहा, कोल्ड्रिंक असे पदार्थ घेऊ नका. या पदार्थांमधल्या घटकांमुळे अनेकांना एन्झायटी वाढण्याचा त्रास होतो आणि त्यामुळे मग झोप येत नाही. रात्रीचं जेवण ७ ते ८ च्या दरम्यान करा. त्यानंतर जेवण करणार असाल तर हलका आहार घ्या. काही जणांना रात्री भरपेट जेवण केल्यामुळे, मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन, ॲसिडीटी असा त्रास रात्रीच्यावेळी होतो आणि त्यामुळेही शांत झोप येत नाही. रोज किमान अर्धा तास तरी तुमच्या आवडीचा कोणताही व्यायाम करा. यामुळेही शांत झोप येण्यास निश्चित मदत होते. स्मोकिंग करणं ही सवय वाईट आहेच. ती सोडायलाच पाहिजे. पण तरी रात्री झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी तरी स्मोकिंग करणे बंद करावे. टीव्हीवर आवडती मालिका- सिनेमा पाहणे, मोबाईल पाहणे या सर्व गोष्टी टाळाव्या. टॅग्स :फिटनेस टिप्सअन्नआरोग्यव्यायामFitness TipsfoodHealthExercise