Join us

व्यायाम न करताही फिगर मेंटेन ठेवायची? ५ सवयी स्वत:ला लावून घ्या, नेहमीच दिसाल चवळीची शेंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 09:25 IST

1 / 6
आपल्या आसपास आपण अशा काही महिला पाहातो ज्या कधीच खूप व्यायाम करत नाहीत. पण तरीही त्यांची तब्येत खूप मेंटेन असते. असं सगळं त्यांना कसं जमतं बघा.. या काही गोष्टी तुम्हीही करून पाहा.. वय वाढलं तरी वजन राहील कंट्रोलमध्येच.(5 tips to maintain your slim figure without doing much exercise)
2 / 6
या महिलांना वेगवेगळ्या कामाच्या स्वरुपातून शारिरीक व्यायाम खूप जास्त असतो. बरीच कामं त्या स्वत: चालून किंवा स्वत: उठून करतात. त्यामुळे त्यांचा चांगला व्यायाम होतो.
3 / 6
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खाण्यावर नियंत्रण ठेवा. उगाच समोर आलं म्हणून खायचं ही सवय सोडा. सगळं खा पण प्रमाणात खा आणि खरंच भूक लागली असेल तरच खा.. वजन वाढणार नाही.
4 / 6
भरपूर प्रमाणात पाणी प्या. पाणी पिण्याची सवय स्वत:ला लावून घ्या. शरीर व्यवस्थित हायड्रेटेड असेल तर क्रेव्हिंग आणि उगाच काहीतरी ताेंडात टाकण्याची सवय खूप कमी होते. शिवाय पचन आणि चयापचय क्रियाही चांगली होते.
5 / 6
रात्रीची झोप ७ ते ८ तासांची झालीच पाहिजे हा नियम पाळा. रात्री उशिरापर्यंत नेहमीच जागरण केल्याने हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि वजन वाढते.
6 / 6
स्ट्रेस मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा भाग आहे. खूप जास्त ताण असणाऱ्या लोकांचं वजन नेहमीच वाढतं. कारण कोणत्याही गोष्टीचा ताण घेतला तर त्या ताणातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे वाढतं वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट व्यवस्थित शिकून घ्या..
टॅग्स : फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्समहिला