Join us   

केस वाढतच नाहीत, कमी वयात पांढरे झाले? ५ योगासनं करा, केस हाेतील मजबूत- लांब, गळणंही होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2023 3:28 PM

1 / 8
कमी वयात केस पांढरे होणे, केस गळणे ही समस्या सध्या अनेकांना जाणवत आहे. काही जणांची केसांची वाढ इतकी कमी झाली आहे, की ती जवळजवळ खुंटल्यासारखीच वाटते.
2 / 8
सध्या आपलं प्रत्येकाचंच जीवन अतिशय व्यस्त झालं आहे. त्यामुळे व्यायामाकडे, आहाराकडे दुर्लक्ष होतं. याचाच परिणाम कुठेतरी केसांवर होतोच. केसांच्या वाढीसाठी डोक्याच्या त्वचेला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होणे, ऑक्सिजन मिळणे गरजेचे असते. तसे झाल्यास त्वचा निरोगी राहते आणि त्याचा चांगला परिणाम केसांच्या वाढीवर दिसून येतो.
3 / 8
म्हणूनच पुढे सांगितलेली काही योगासनं काही दिवस नियमित करून बघा. यामुळे डोक्याच्या त्वचेला पुरेसा रक्तपुरवठा होऊन केसांची वाढ चांगली होण्यास तसेच केसांच्या इतर तक्रारी कमी होण्यास मदत होईल.
4 / 8
यापैकी सगळ्यात पहिलं आसन म्हणजे भुजंगासन. हे आसन करताना डोक्याच्या त्वचेला पुरेसा रक्तपुरवठा होतो.
5 / 8
कपालभाती प्राणायाम नियमित केल्यामुळे संपूर्ण शरीरालाच फायदा होतो. संपूर्ण शरीरातच ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. त्यामुळे दिवसातून दहा मिनिटे तरी कपालभाती प्राणायाम करा. २- ३ मिनिटांपासून सुरुवात करून हळूहळू कपालभाती करण्याचा वेळ वाढवत न्या.
6 / 8
मत्स्यासन करताना डोके जमिनीला टेकवले जाते. यामुळे साहजिकच डोक्याच्या दिशेने चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा होतो.
7 / 8
शिर्षासन हे मेंदूसाठी तसेच केसांसाठी अतिशय चांगले मानले जाते. कारण या आसनस्थितीत शरीराचा रक्तपुरवठा पुर्णपणे डोक्याच्या दिशेने होत असतो. ही बाब केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पुरक आहे.
8 / 8
शिर्षासनाप्रमाणेच सर्वांगासन केल्यानेही केसांना फायदा होतो. शिर्षासनाप्रमाणेच सर्वांगासन करताना संपूर्ण शरीराचा भार डाेक्यावर आणि खांद्यावर येतो. त्यामुळे डोक्याच्या भागात रक्तपुरवठा चांगला होऊन त्याठिकाणी भरपूर ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. याचा चांगला परिणाम केसांवर दिसून येतो.
टॅग्स : फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदेकेसांची काळजी