5 Yogasana that gives strength to legs, Yoga that tone your leg
पाय सारखेच दुखतात, वेदना सहनच होत नाहीत? करिना कपूरची फिटनेस ट्रेनर सांगतेय ५ योगासनं, पायदुखी कमीPublished:September 13, 2022 08:10 AM2022-09-13T08:10:10+5:302022-09-13T08:15:01+5:30Join usJoin usNext १. दिवसभर आपण आपल्या कामात व्यस्त असतो. त्यामुळे जाणवत नाही. पण रात्री अंथरुणात पडलं की मग मात्र पाय किती ठणठण करत आहेत, याची जाणीव व्हायला लागते. काही जणींचे पाय कधी कधी तर काही जणींचे पाय रोजच दुखतात. त्यामुळे मग कित्येक जणींना तर झोपही येत नाही. २. एखाद्या दिवशी खूपच दगदग झाली किंवा खूप जास्त चालणं झालं, तर पाय दुखणं समजू शकतो. पण जर रोजच पाय दुखत असतील आणि ते दुखणं असह्य होत असेल, तर मात्र त्यावर उपाय करणं गरजेचं आहे. करिना कपूर, आलिया भट यांच्यासह इतर बॉलीवूड सेलिब्रिटींच्या फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी त्यासाठी काही खास योगासनं सांगितले आहे. ३. यासंदर्भातला एक व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामला पोस्ट केला असून यात त्या म्हणतात की हे व्यायाम पायांच्या स्नायुंना मजबूत करण्यासाठी तसेच लेग टोनिंगसाठीही अतिशय उपयुक्त आहेत. ही काही योगासने नियमित केली तर पाय सुडौल तर होतीलच पण त्यांचे दुखणेही कमी होईल. ४. अंशुका यांनी सांगितलेलं पहिलं आसन म्हणजे अंजनेयासन. यालाच Crescent Moon Pose असंही म्हणतात. यामुळे पायाच्या मांसपेशी ताणल्या जातात आणि त्यांच्यात मजबुती येते. ५. दुसरं आसन म्हणजे उत्कटासन. यालाच चेअर पोझ असंही म्हणतात. या पोझमध्ये दोन्ही हात वर सरळ रेषेत असतात. आणि खुर्चीवर बसल्यासारखी अवस्था केली जाते. यामुळे हिप्स, कंबर येथील स्नायूंनाही बळकटी मिळते. ६. पायांचा व्यायाम करण्यासाठीचं तिसरं योगासन म्हणजे पुर्वोत्तानासन. यालाच Upward Plank Pose असंही म्हणतात. हा व्यायाम करताना पोटऱ्यांच्या तसेच हातांच्या स्नायुंवर विशेष ताण येतो. ७. चाैथा व्यायाम प्रकार म्हणजे त्रिकोनासन. यालाच आपण Triangle Pose असंही म्हणतो. दोन्ही पाय, गुडघे तसेच कंबरेच्या व्यायामासाठी हे आसन उत्तम आहे. ८. पाचवा व्यायाम म्हणजे मलासन. यालाच Garland Pose या नावानेही ओळखलं जातं. टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदेकरिना कपूरआलिया भटFitness TipsExerciseYogaKareena KapoorAlia Bhat