आई झाल्यावर व्यायाम करायला वेळच नाही? ७ व्यायाम, १ केला तरी व्हाल आलिया भटसारखे फीट.. Published:December 26, 2022 05:12 PM 2022-12-26T17:12:11+5:30 2022-12-26T17:43:15+5:30
7 Best Exercise After Pregnancy : बाळंतपणनंतर लठ्ठपणा किंवा जाड होणे ही महिलांसाठी एक मोठी समस्या आहे. सोपे व्यायाम प्रकार घरच्या घरी केल्याने तुमचे वजन लगेच कमी होऊ शकते. प्रत्येक स्त्रीला आई होण्याच्या प्रक्रियेतून जावे लागते. आई होणे किती अवघड आहे याची कल्पना प्रत्येक स्त्रीला असते. प्रसुती हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातला अतीशय कठीण असा काळ असतो आणि महिलांसाठी अधिक कष्टप्रद आणि तीव्र वेदनादायक असतो. एक आई बाळाला नऊ महिन्यांपर्यंत तिच्या पोटात ठेवते. असे म्हणतात की जेव्हा एखादी स्त्री मुलाला जन्म देते, तेव्हा त्यावेळी मुलासोबत स्त्रीचा दुसरा जन्म झालेला असतो. प्रसूती दरम्यान होणारी वेदना फक्त स्त्रीलाच माहित असते.आई होण्याचा आनंद मिळवण्यासाठी स्त्रीला खूप वेदना सहन कराव्या लागतात. केवळ बाळंतपणातच नव्हे तर बाळंतपण झाल्यानंतर देखील तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. लठ्ठपणा किंवा जाड होणे ही त्यापैकी एक मोठी समस्या आहे. हा लठ्ठपणा दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे डाएट, व्यायाम फॉलो करतो. एवढे करूनही कधी कधी आपल्या हाती निराशाच येत. काही सोपे व्यायाम प्रकार घरच्या घरी केल्याने तुमचे वजन लगेच कमी होऊ शकते. बाळंतपण नंतर तुमच्या फिटनेस रुटीनमध्ये, या महत्वाच्या ७ एक्सरसाइजचा समावेश करा (7 Best Exercise After Pregnancy).
चालणे (Walking) -
प्रेग्नेंसी झाल्यानंतर चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे. सुरुवातीला फक्त १५ मिनिटे सलग चालण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर चालण्याचा वेग आणि वेळ हळू - हळू वाढवत न्या. सुरुवातीला तुम्ही हा चालण्याचा हलका व्यायाम केलात तर पुढे काही दिवसांनी तुम्ही हाय इंटेन्स वर्कआऊट करण्यासाठी तयार व्हाल.
स्ट्रेचिंग (Stretching) -
एकदा तुमच्या शरीराला चालण्याची सवय लागली की, हळूहळू स्ट्रेचिंगचे व्यायाम तुम्ही करू शकता. स्ट्रेचिंगचे व्यायाम प्रकार केल्याने तुमचे मसलस टोण्ड आणि मजबूत होण्यास मदत होईल. स्ट्रेचिंग केल्यामुळे प्रेग्नेंसी दरम्यान वाढलेले फॅट्स लवकरात लवकर कमी होते.
योगा (Yoga) -
प्रेग्नेंसी झाल्यानंतर जर तुमचे शरीर, मन या दोहींवरील ताण कमी करून शांतात व रिलॅक्सेशनचा अनुभव घ्यायचा असेल तर योगा हा बेस्ट पर्याय आहे. प्रेग्नेंसी झाल्यानंतरचे ओटीपोटातील एक्स्ट्रा फॅट्स योगामुळे तुम्ही सहज बर्न करू शकता. सकाळच्या वेळी योग केल्याने तुमचे पूर्ण शरीर रिलॅक्स तर होईलच पण सोबतच तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहाल. योगा करण्यासाठी तुम्ही योगा ट्रेनरची मदत घेऊ शकता.
स्विमिंग (Swimming) -
प्रेग्नेंसीच्या झाल्यानंतर लगेच नाही पण किमान २ महिन्यानंतर तुम्ही स्विमिंग करू शकता. डॉक्टर व स्विमिंग ट्रेनर यांच्या सल्ल्यानुसारच स्विमिंग या व्यायाम प्रकारची निवड करावी. स्विमिंग केल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होईलच पण त्याचबरोबर तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल.
एरोबिक्स (Aerobics) -
डिलिव्हरी झाल्यानंतर मुख्यत्वे करून तुमचे दंड, पोट, मांड्या, नितंब या अवयवांवरील फॅट्स वाढते. हे फॅट्स कमी करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. डिलिव्हरी नंतर करावयाच्या व्यायाम प्रकारात एरोबिक्स हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे. एरोबिक्समुळे फक्त तुमच्या शरीरातील फॅट्सच कमी होत नाहीत तर दिवसभर अॅक्टिव्ह राहण्यासाठीसुद्धा फायदेशीर ठरते.
कीगल एक्सरसाइज (Kegel Exercise) -
पेल्विक फ्लोर एक्सरसाइज ही एक कीगल एक्सरसाइज आहे. प्रेग्नेंसी झाल्यानंतर करावयाच्या एक्सरसाइज मधील ही एक महत्वाची एक्सरसाइज आहे. या एक्सरसाइजमुळे तुमचे गर्भाशय व मूत्राशय दोन्ही हेल्दी राहतात. हा एक्सरसाइज केल्यामुळे तुमच्या पेल्विक फ्लोर म्हणजेच ओटीपोटातील रक्तप्रवाह आणि मांसपेशींचे आरोग्य सुरळीत ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. पेल्विक फ्लोकच्या मांसपेशींमध्ये कमजोरी आल्यावर लघवीचा प्रवाह रोखण्याची क्षमता कमजोर होते. ही समस्या महिलांमध्ये प्रेग्नेंसीनंतरच्या काळामध्ये पाहायला मिळते. अशा परिस्थिती डॉक्टर कीगल एक्सरसाइज करण्याचा सल्ला देतात.
पेल्विक टिल्ट (Pelvic Tilt) -
पोटातील मसल्सना मजबूत करण्यासाठी दिवसातून एकदा पेल्विक टिल्ट हा व्यायाम प्रकार करणे गरजेचे आहे. पेल्विक टिल्ट करण्यासाठी जमिनीला आपली पाठ टेकेल असे झोपा त्यानंतर तुमचे गुडघे वाकवा. दोन्ही हात जमिनीला स्पर्श करतील असे ठेवा. त्यानंतर तुमच्या खांद्यांवर जोर देऊन तुमचा कमरेखालील भाग हळू - हळू वर उचलण्याचा प्रयत्न करा. या स्थितीमध्ये १० सेकंद असेच राहा. त्यानंतर किमान ५ वेळा तरी हा व्यायाम प्रकार करा.