दिवसभर लॅपटॉपवर काम करुन खांदे आखडतात? १० मिनीटांत होणारे ७ सोपे व्यायाम, मिळेल आराम...

Published:February 8, 2023 03:03 PM2023-02-08T15:03:42+5:302023-02-08T15:10:56+5:30

7 Yoga Poses For Shoulder Pain : प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी काही सोपे व्यायामप्रकार सांगतात.

दिवसभर लॅपटॉपवर काम करुन खांदे आखडतात? १० मिनीटांत होणारे ७ सोपे व्यायाम, मिळेल आराम...

दिवसभर लॅपटॉपवर काम करुन आपली पाठ-मान तर अवघडतेच. पण अशाप्रकारे सतत एकाच पोश्चरमध्ये बसून अनेकदा आपले खांदेही अवघडतात. म्हणूनच खांदेदुखी होऊ नयेत यासाठी प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी काही सोपे व्यायामप्रकार सांगतात (7 Yoga Poses For Frozen Shoulder or Shoulder Pain).

दिवसभर लॅपटॉपवर काम करुन खांदे आखडतात? १० मिनीटांत होणारे ७ सोपे व्यायाम, मिळेल आराम...

खांदे एकदा अवघडले की ते मोकळे होणं थोडं कठीण असतं. त्यासाठीच दररोज फक्त १० मिनीटे हे व्यायामप्रकार केले तर खांद्याची हालचाल सुरळीत होण्यास मदत होते. आणि फ्रोजन शोल्डर, खांदे आखडणे अशा तक्रारींपासून आपण दूर राहू शकतो.

दिवसभर लॅपटॉपवर काम करुन खांदे आखडतात? १० मिनीटांत होणारे ७ सोपे व्यायाम, मिळेल आराम...

हे पारंपरिक प्रकारातील आसन असून यामुळे खांद्याच्या सगळ्या स्नायुंना ताण पडण्यास मदत होते. सुरुवातीला हे आसन अवघड वाटत असले तरी प्रयत्नांनी ते जमते. दोन्ही हाताने नियमित केल्यास खांद्यांची हालचास सहज होण्यास मदत होते.

दिवसभर लॅपटॉपवर काम करुन खांदे आखडतात? १० मिनीटांत होणारे ७ सोपे व्यायाम, मिळेल आराम...

काम करताना किंवा मोकळ्या वेळात आपण सहज करु शकू असे हे आसन आहे. भिंतीला टेकून हातांना आणि खांद्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने ताण दिल्यास खांदे रिलॅक्स व्हायला मदत होते.

दिवसभर लॅपटॉपवर काम करुन खांदे आखडतात? १० मिनीटांत होणारे ७ सोपे व्यायाम, मिळेल आराम...

वॉर्म अप मधील हा अतिशय बेसिक व्यायाम असून तो आपण घरात जातायेताही करु शकतो. सतत खांदे एकाच अवस्थेत राहीले तर त्यांना इजा होण्याची शक्यता असते. पण खांद्यातील वंगण टिकून राहण्यासाठी त्यांची पुरेशी हालचाल व्हायला हवी. यासाठी हात खांद्यातून गोलाकार फिरवणे हा अतिशय सोपा व्यायाम आहे.

दिवसभर लॅपटॉपवर काम करुन खांदे आखडतात? १० मिनीटांत होणारे ७ सोपे व्यायाम, मिळेल आराम...

दोन्ही पायांची मध्यभागी घडी घालून पाय वर खाली हलवायला हवेत. सुरुवातीला ही क्रिया १५ सेकंद करुन हळूहळू हा कालावधी वाढवत न्यावा. साधारण २ मिनीटांपर्यंत आपण या अवस्थेत राहू शकू इतका सराव करायला हवा.

दिवसभर लॅपटॉपवर काम करुन खांदे आखडतात? १० मिनीटांत होणारे ७ सोपे व्यायाम, मिळेल आराम...

बेडकाची ठेवण ज्याप्रमाणे असते त्याचप्रमाणे आपल्या शरीराची अवस्था करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे खांदे आणि खांद्याच्या आजुबाजूच्या स्नायुंचे चांगले स्ट्रेचिंग होण्यास मदत होते.

दिवसभर लॅपटॉपवर काम करुन खांदे आखडतात? १० मिनीटांत होणारे ७ सोपे व्यायाम, मिळेल आराम...

मांजर ज्याप्रमाणे पाठ सहजरित्या वर-खाली करु शकते, त्याचप्रमाणे आपणही करु शकतो. यामुळे हात, खांदे, पाठीचा भाग या सगळ्याला ताण पडतो आणि खांद्यांबरोबरच पाठीलाही चांगला आराम मिळण्यास मदत होते.

दिवसभर लॅपटॉपवर काम करुन खांदे आखडतात? १० मिनीटांत होणारे ७ सोपे व्यायाम, मिळेल आराम...

इंग्रजीत यालाच आपण प्लँक पोझ म्हणतो. दिसायला सोपी दिसत असली तरी हात आणि पायाच्या चवड्यांवर संपूर्ण शरीराचा भार पेलणे तितके सोपे नसते. पण नियमितपणे हे आसन केल्यास खांद्याचा व्यायाम होण्यास निश्चितच मदत होते.