आलिया भटशिवाय कोणालाच जमेना 'हा' व्यायाम, म्हणूनच त्याला म्हणतात 'आलिया पोझ'- बघा कशी करायची By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2024 9:09 AM 1 / 7आलिया भट आणि तिचं फिटनेस प्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणूनच तर राहाच्या जन्मानंतर अवघ्या एक महिन्यातच आलियाने पुन्हा एकदा व्यायामाला सुरुवात केली होती.2 / 7प्रेग्नन्सी, बाळंतपण यानंतर खूपच पटकन तिने व्यायाम सुरू केला आणि ती पुन्हा तिची पुर्वीची फिगर मिळविण्यात यशस्वी झाली. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांच्याकडे आलिया फिटनेसचे धडे गिरवते.3 / 7अंशुका यांनी आलियाबाबतची एक पोस्ट नुकतीच सोशल मिडियावर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आलियाचा एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात आलिया कपोतासन (Kapotasana) म्हणजेच Pigeon Pose करताना दिसते आहे. 4 / 7याविषयी अंशुका यांनी लिहिलं आहे की २०२१ मध्ये त्यांनी आलियाला कपोतासन करायला सांगितलं होतं. आलियाने बराच प्रयत्न करून एका व्हिलच्या मदतीने ते अगदी उत्तमपणे केलं.5 / 7आलियाने केलेलं कपोतासन पाहून नंतर अनेकांनी ते करण्याचा प्रयत्न केला. पण आलियासारखं सफाईदारपणे ते कुणाला जमलं नाही. म्हणूनच त्यानंतर त्यांनी त्या आसनाला गमतीने 'आलिया पोझ' असं म्हणायला सुरुवात केली. 6 / 7आता प्रेग्नन्सी, बाळंतपण यानंतर पुन्हा एकदा डिसेंबर- २३ मध्ये आलियाने हे आसन करून पाहिलं आणि त्यावेळीही तिला ते अगदी परफेक्ट जमलं. त्यामुळे आलियाच्या फिटनेस ट्रेनर तिच्यावर भारीच खुश असून त्यांनी त्याच आनंदात ही पोस्ट शेअर केली आहे.7 / 7कपोतासन हा खरोखरच एक अवघड व्यायाम प्रकार आहे. यामध्ये पाठीचा कणा पुर्णपणे मागच्या बाजुने वाकवला जातो. रोजची व्यायामाची सवय असल्याशिवाय कपोतासन जमणे अशक्य आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications