1 / 7थायरॉईडचा त्रास असेल तर त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषधोपचार करणं गरजेचंच आहे. त्याला दुसरा पर्याय नाहीच.2 / 7 पण तरीही गोळ्या- औषधींसोबतच जर काही योगासनं नियमितपणे केली तर तुमच्या थायरॉईड ग्रंथीजवळ योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होतो, तसेच त्या ग्रंथीचे काम आणखी उत्तम पद्धतीने होण्यास मदत होते, असं सेलिब्रिटी ट्रेनर अंशुका परवानी सांगतात. म्हणूनच थायरॉईडचा त्रास कमी करण्यासाठी त्यांनी काही योगासनं करण्याचा सल्ला दिला आहे.3 / 7यापैकी पहिलं आहे भुजंगासन. यामुळे थायरॉईड ग्रंथीचा आणि त्याच्या आजुबाजुला असणाऱ्या पेशींचा चांंगला व्यायाम होतो.4 / 7दुसरं आहे कॅट- काऊ पोज. हा व्यायाम नियमितपणे केल्यास नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल.5 / 7तिसरे योगासन आहे सेतूबंधासन म्हणजेच ब्रीज पोज. याने गळ्यावर चांगला ताण येऊन तेथील स्नायूंचा व्यायाम होतो.6 / 7चौथे आहे मक्रासन. करायला सोपा असणारा हा व्यायाम थायरॉईडचा त्रास कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो.7 / 7पाचवे आहे उष्ट्रासन. हे सगळे व्यायाम प्रकार दररोज कमीकमी १ ते जास्तीतजास्त ३ मिनिटांपर्यंत करावेत.