व्यायाम करायचा कंटाळा येतो? या आनंददायी कृती करा.. वजन झटपट कमी होईल

Updated:April 7, 2025 18:51 IST2025-04-07T18:46:38+5:302025-04-07T18:51:50+5:30

Are you bored of exercising? Do these enjoyable activities.. You will lose weight quickly : हसत हसत वजन कमी करा. आवडत्या कृती करत वजन कमी करता येते. पाहा कसे.

व्यायाम करायचा कंटाळा येतो? या आनंददायी कृती करा.. वजन झटपट कमी होईल

आपल्याला वजन कमी करायची तर इच्छा असते. मात्र व्यायाम करायला आपण प्रचंड आळस करतो. तुम्हालाही जर व्यायाम करायचा वैताग येतो तरीही वजन कमी करायचे आहे तर मग या काही पद्धतींचा वापर करा.

व्यायाम करायचा कंटाळा येतो? या आनंददायी कृती करा.. वजन झटपट कमी होईल

काही व्यायाम असे ही असतात जे करताना फार मज्जा येते. व्यायामही होतो आणि कंटाळाही येत नाही. लहानपणी हे व्यायाम आपण भरपूर केले आहेत आता पुन्हा करायला काहीच हरकत नाही.

व्यायाम करायचा कंटाळा येतो? या आनंददायी कृती करा.. वजन झटपट कमी होईल

सायकल चालवणे हा एक उत्तम व्यायाम आहे. वजन झटपट कमी होते. चरबी कमी होते. सायकल चालवायला मज्जाही फार येते. खुल्या मैदानामध्ये सायकल चालवायची. दिवसातून तासभर जरी सायकल चालवली तरी वजन कमी करण्यासाठी मदत होईल.

व्यायाम करायचा कंटाळा येतो? या आनंददायी कृती करा.. वजन झटपट कमी होईल

नृत्य केल्याने वजन कमी होते. त्याचाच एक प्रकार म्हणजे झुंबा. झुंबा क्लासेसला जाऊ शकता. ते महाग वाटत असतील तर मोबाइलवर फ्री व्हिडिओ्ज पाहून त्यांच्यानुसार झुंबा करू शकता. छान गाणी लाऊन हा व्यायाम करायचा आहे.

व्यायाम करायचा कंटाळा येतो? या आनंददायी कृती करा.. वजन झटपट कमी होईल

प्रत्येकाला कोणता तरी मैदानी खेळ खेळायला नक्की आवडतो. असे खेळ पुन्हा खेळायला सुरवात करा. बॅडमिंटन खेळा. चपळताही वाढते शरीराची भरपूर हालचाल होते. त्यामुळे वजनही कमी होते.

व्यायाम करायचा कंटाळा येतो? या आनंददायी कृती करा.. वजन झटपट कमी होईल

बेडवर पडल्या पडल्या काही व्यायाम करता येतात. अशी काही योगासनेही आहेत जी आरामत बसल्याबसल्या करता येतात. असे बैठे व्यायाम करा.

व्यायाम करायचा कंटाळा येतो? या आनंददायी कृती करा.. वजन झटपट कमी होईल

वजन कमी करायचे असेल तर आहार चांगलाच हवा. अनेक अशा रेसिपी आहेत ज्या फार चविष्ट आहेत आणि पौष्टिकही असतात. अशा रेसिपी करून खा. चवही आवडेल आणि वजनही आटोक्यात राहिल.

व्यायाम करायचा कंटाळा येतो? या आनंददायी कृती करा.. वजन झटपट कमी होईल

भाजी आणायला जाताना किंवा बाजारात जाताना जर गाडीने जात असाल तर, चालत जायला सुरवात करा. कामही होते आणि व्यायामही होतो. लहान लहान कामांसाठी गाडी वापरू नका.

व्यायाम करायचा कंटाळा येतो? या आनंददायी कृती करा.. वजन झटपट कमी होईल

लाफ्टर क्लबबद्दल तर तुम्ही ऐकलेच असेल. असा क्लब जर तुमच्या जवळपास असेल तर तो नक्की जॉईन करा. हसत हसत वजन कमी होईल. तसेच मानसिक ताणही कमी होईल.

व्यायाम करायचा कंटाळा येतो? या आनंददायी कृती करा.. वजन झटपट कमी होईल

तुम्हाला पोहायला आवडत असेल तर पोहायला जात जा. पोहणे हा एक उत्तम व्यायाम आहे. वजन झटपट कमी होते. तसेच श्वासोश्वासाची प्रक्रियाही सुरळीत होते. दम कमी लागतो.