as per new health studies 11 minutes walking will give you 11 type of different health benefits
अभ्यासक सांगतात दररोज ११ मिनिटे चाला आणि ११ फायदे मिळवा! बघा हा कोणता भन्नाट उपाय...Published:August 21, 2024 04:31 PM2024-08-21T16:31:34+5:302024-08-21T16:41:46+5:30Join usJoin usNext दररोज अगदी नेमाने तुम्ही ११ मिनिटे चालण्याचा व्यायाम केला तर तुमच्या तब्येतीला ११ वेगवेगळ्या प्रकारचे फायदे मिळतील, असा निष्कर्ष ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट मेडिसिन यांनी एका अभ्यासाद्वारे काढला आहे. एवढंच नाही तर यामुळे कमी वयात आरोग्याच्या तक्रारींमुळे अकाली मृत्यू होण्याचा धोकाही २५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो असं त्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. (as per new health studies 11 minutes walking will give you 11 type of different health benefits) आता सध्या वेळेअभावी मायक्रो वर्कआऊट ही संकल्पना सगळीकडेच जोर धरत आहे. ११ मिनिटे चालण्याचा हा व्यायामही त्याच प्रकारातला. पण चालताना तुम्ही खूप हळू किंवा खूप जलद चालू नका. तसेच सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जमेल तसा वेळ काढा... बघा त्यामुळे नेमके काय फायदे होतील.. १. यामुळे तुमची क्रिएटीव्हीटी वाढते. अधिक उत्साही वाटतं. २. कॅलरी बर्न होण्यासाठी फायदा होतो. वेटलॉस करत असाल तर त्यासाठी याची निश्चितच मदत होईल. ३. हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. ४. थोड वेळ का होईना पण मोकळ्या हवेत जाऊन चालल्यामुळे स्ट्रेस कमी होतो. ५. मूड फ्रेश होतो. मनातली, शरीराची मरगळ निघून जाते. ६. पाय, गुडघे, घोटे दुखत असतील तर तो त्रासही कमी होतो ७. ब्रिस्क वॉकिंग केलं तर फॅट बर्न होण्यास मदत होते. ८. ११ मिनिटांसाठी ब्रिस्क वॉकिंग केल्यामुळे टाईप २ डायबिटीजही नियंत्रित राहण्यास मदत होते. ९. जलद चालल्यामुळे शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे रात्री चांगली झोप येते. १०. नियमित चालल्यामुळे शरीरात एका विशिष्ट हार्मोनची निर्मिती होते. तो मेंदू तल्लख ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. ११. पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे ॲसिडीटीचा त्रासही बऱ्याच प्रमाणात कमी होतो. टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायाममधुमेहवेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सFitness TipsExercisediabetesWeight Loss TipsHealthHealth Tips