Join us   

पोटावरची चरबी चटकन कमी व्हावं असं वाटतं? ४ टिप्स- सुटलेल्या पोटाचं टेंशन कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 6:15 PM

1 / 7
खराब लाईफस्टाईल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्य सवयींमुळे लाखो लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. अनेक लहान मुलांची तब्येत वाढलेली येते. शरीराची चरबी वाढत गेली की कमी करणं कठीण होतं. अशावेळी वजन कमी करण्यासाठी काय करावं कळत नाही. (Easy Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life)
2 / 7
काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही पोटावरची वाढलेली चरबी कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी कोणती पद्धत अवलंबावी, जेणेकरून ते कमी वेळात स्लिम-ट्रिम होऊ शकतील, हे बऱ्याच लोकांना समजत नाही. त्यासाठी तुम्ही रोज काय खाता, किती वेळ झोपता याचा रेकॉर्ड ठेवणं महत्वाचं असतं.
3 / 7
शरीराचे वाढते वजन रोखण्यासाठी सकाळचा नाश्ता परिपूर्ण असणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही पोहे, उपमा, लापशी, रस, फळे, कोशिंबीर, ओट्स, अंडी, चीला किंवा साबुदाणा दलिया खाऊ शकता. या प्रकारच्या नाश्त्यामुळे शरीराला प्रथिने आणि फायबर मिळतात, त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन कमी करण्यासही मदत होते.
4 / 7
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज 7-8 तास पुरेशी झोप घ्या. यासाठी रात्री वेळेवर झोपा आणि सकाळी सूर्यकिरणांपूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. हे काम थोडे अवघड आहे पण अशक्य नाही. सुरुवातीला तुम्हाला काही दिवस त्रास होईल पण त्यानंतर सवय होईल.
5 / 7
जेवणाच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तासनंतर पाणी प्या. जेवता जेवता पाणी प्यायल्यानं जठराग्नी शांत होते आणि अन्न पचण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात.
6 / 7
सकाळी उठल्याबरोबर काहीही खाण्या-पिण्याऐवजी किमान अर्धा लिटर कोमट पाणी प्या. अशा प्रकारे पाणी प्यायल्याने पचनसंस्था नीट काम करते, ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
7 / 7
सकाळी तुम्ही न्याहारीपूर्वी मध आणि लिंबू पाणी पिऊ शकता. यामुळे फॅट बर्न होतात आणि शरीर मेंटेन राहते.
टॅग्स : वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य